Sunday , August 23 2026
Breaking News

निपाणीत बेंदूर सणानिमित्त कर तोडणी कार्यक्रमाला मानकऱ्यासह नागरिकांची गर्दी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजी राजे निपाणकर राजवाड्यामध्ये शेकडो वर्षापासून बेंदूर सणानिमित्त कर तोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. यंदाही येथील गांधी श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर- सरकार, विजयराजे देसाई- सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील गांधी चौकात मानाच्या बैल जोड्याद्वारे कर तोडणीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मानकऱ्यासह नागरिकांची गर्दी झाली होती.
बेंदूर सणाच्या आदल्या दिवशी ‌निपाणकर राजवाड्यामध्ये बैलांना आणून त्यांना खिचडा व आंबील पाजून त्यांचे खांदे लोणी आणि हळद घालून मळण्यात आले. त्यानंतर निपाणकर सरकार घराण्यातर्फे पूजा करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी मातंगी समाजाच्या मानकऱ्यानी राजवाड्याच्या दरवाजांच्यावर मानाचे तोरण बांधले. बैलांना हळवी, डीकमल, हळद, मसाले अंडी पाजण्यात आली. बैलांना अंघोळ घालून पुरणपोळीचा नैवेद्य गुळ खोबरे कांदा तसेच शिंगामध्ये शिंगोळ्या घालून ओवाळणी करण्यात आली.
संध्याकाळी बैल जोड्यांना सजवून मिरवणुकीने गांधी चौकात नेण्यात आले. तेथे बन्नीच्या शिऱ्या ओलांडत बैलांनी कर तोडण्यात आली. त्यानंतर बैलांना पुन्हा राजवाड्यात आणून ओवाळणी करण्यात आली.
कार्यक्रमास श्रीमंत विजयराजे देसाई, श्रीमंत राजेश राजे देसाई, श्रीमंत युवराज सिद्धजीराजे निपाणकर, वीरेंद्र तारळे, संदीप सासणे, हेमंत सासणे, अनिल डोंगरे, मच्छिंद्र कमते, सागर कमते, प्रदीप इंगवले, ऋषिकेश माळवे, नामदेव नाईक, संदीप सासणे, प्रवीण बुधिहाळे, सुहास इंगवले, संजय पाटील, प्रसन्ना सव्वाशे, संजय कांबळे, सुजित गायकवाड, अमोल भोसले, सचिन पावले, निलेश पावले, आप्पा यरनाळे, शंकर पावले, सुजित पावले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

 

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे देवचंद कॉलेज परिसरात बाकडी

Spread the love  निपाणी (वार्ता) : सामाजिक बांधिलकीची विचारधारा जपत जेष्ठ नागरिक सेवा संघा तर्फे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *