Friday , July 3 2026
Breaking News

बेळगावकर सरांच्या कार्याचा गौरव; सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळेत सत्कार समारंभ

Spread the love

 

मच्छे : येथील सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथील सहशिक्षक तसेच गेली अडीच वर्षे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून यशस्वीपणे कार्यभार सांभाळलेले मा. श्री. बेळगावकर सर यांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांनी वाघवडे येथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू होत आपल्या शाळेचा निरोप घेतला. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शाळेत नुकताच सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी एसडीएमसी अध्यक्ष श्री. सुधीर हावळ  हे होते. तर विद्यमान एसडीएमसी अध्यक्ष श्री. गजानन छप्रे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. शेळके सर यांनी केले.

यावेळी श्री. संतोष चोपडे सर, एसडीएमसी अध्यक्ष श्री. गजानन छप्रे तसेच श्री. प्रशांत नांदोडकर यांनी बेळगावकर सरांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व विकासात्मक योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले.

बेळगावकर सरांनी आपल्या कार्यकाळात शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच शाळेसाठी नवीन स्वच्छतागृहे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक जाळ्या, कार्यालयाचे सुशोभीकरण, वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात, आषाढी एकादशी दिंडी, वाचनालय व विज्ञान कक्षाची उभारणी अशा अनेक विकासकामांमध्ये मोलाचे योगदान दिले. समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने त्यांनी शाळेच्या विकासाला नवी दिशा दिली.

यावेळी उपस्थित वक्त्यांनी सांगितले की, शाळेच्या विकासासाठी विविध योजना प्रत्यक्षात राबविताना येणाऱ्या अडचणींवर मात करून बेळगावकर सरांनी सातत्याने कार्य केले. त्यांचे कार्य हे केवळ कर्तव्यपूर्ती नसून शाळेप्रती असलेल्या समर्पणाचे प्रतीक आहे.

या सत्कार समारंभाच्या औचित्य साधून बेळगावकर सरांनी शाळेसाठी ₹५,००१ ची देणगी देऊन शाळेप्रती असलेले आपले प्रेम आणि बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुलकर्णी मॅडम यांनी केले. कार्यक्रमास शिक्षकवृंद, उपाध्यक्षा मोहिनी बलेकुंद्री, अमोल लाड, पूजा चौगुले, नम्रता लाड, ज्योती कनबरकर, वैशाली लाड, रुक्मिणी लाड, सोमनाथ पाटील, अनिल करडी, मोहन उसुलकर, व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

संत मीरा, भातकांडे, शांतिनिकेतन शाळेचा अंतिम फेरीत प्रवेश

Spread the love  बेळगाव : टिळकवाडी येथील नेताजी सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *