Sunday , August 23 2026
Breaking News

राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने प्रा. विठ्ठल नाईक सन्मानित

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : पत्रकारिता क्षेत्रातील कामाची दखल घेत महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार असोसिएशन आणि नागरिक सेवा संस्थेतर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. विठ्ठल नाईक यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषद विरोधी गटनेते आम. सतेज उर्फ बंटी पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश के सरकर व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण करण्यात आला. प्रा.विठ्ठल नाईक यांनी सीएलईडीएड महाविद्यालयात उपप्राचार्य आणि उत्तूर येथील डॉ. जे. पी. नाईक महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काही वर्षे सेवा बजावली आहे. शिवाय २२ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून शिक्षण आणि सामाजिक विषयांवर दर्जेदार लेखन केले आहे. शिवाय सामाजिक विकासातही त्यांचा पुढाकार असतो. त्यांच्या शिक्षण, समाजसेवा आणि पत्रकारिता क्षेत्रातील कामाची दखल घेत या राष्ट्रीय समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
शाल, फेटा, शिल्ड, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे. कार्यक्रमास असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर, उपाध्यक्ष सखाराम जाधव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंगराव सावंत, सहकार तज्ञ प्रभाकर कांबळे यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे देवचंद कॉलेज परिसरात बाकडी

Spread the love  निपाणी (वार्ता) : सामाजिक बांधिलकीची विचारधारा जपत जेष्ठ नागरिक सेवा संघा तर्फे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *