Sunday , August 23 2026
Breaking News

डॉक्टर्स डे निमित्त डॉ. राजश्री अनगोळ यांचा जायंट्स सखीतर्फे सन्मान

Spread the love

 

बेळगाव : राष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या निमित्ताने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या वतीने बालरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री अनगोळ यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. बी. के. मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी डॉक्टरांचे योगदान मोलाचे असून त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सन्मानानंतर डॉ. राजश्री अनगोळ यांनी ‘बालकांचे आरोग्य आणि पालकांची जबाबदारी’ या विषयावर मार्गदर्शन केले. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, स्वच्छतेच्या सवयी, वेळेवर लसीकरण, पुरेशी झोप आणि मानसिक आरोग्य यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच वाढत्या मोबाईल व स्क्रीन टाइममुळे मुलांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट करून पालकांनी मुलांसोबत अधिक वेळ घालवत त्यांच्याशी संवाद वाढविण्याचे आवाहन केले.

यावेळी बी. के. मॉडेल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉ. सुचेता कुलकर्णी तसेच बी. ई. सोसायटीचे सचिव अरविंद हुंनगुंद यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे नेतृत्व जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांनी केले. याप्रसंगी फेडरेशन ऑफिसर अपर्णा पाटील यांच्यासह राजश्री हसबे, दीपा पाटील, स्वाती फडके, शीतल नेसरीकर, वरदा अंगडी, अर्चना कंग्राळकर, सुलोचना कुट्रे, वैशाली भातकांडे, भाग्यश्री पवार, संजना पाटील, चंदा चोपडे, विद्या सरनोबत, रश्मिता यादव, विद्या बांदीवडेकर तसेच जायंट्स सखीच्या अनेक सदस्या उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

१५ दिवस शवागृहात असलेल्या अनोळखी मृतदेहाला सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला अखेरचा निरोप

Spread the love  बेळगाव : गेल्या १५ दिवसांपासून सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागृहात ठेवण्यात आलेल्या अनोळखी मृतदेहावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *