Sunday , August 23 2026
Breaking News

सीसीबीची कारवाई : ९ लाखांच्या हेरॉईनसह एकाला अटक

Spread the love

 

बेळगाव : शहरातील अमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधात सीसीबी (CCB) पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ९ लाख रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

३० जून २०२६ रोजी सिसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक मंजनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंजनाथ भजन्त्री व त्यांच्या पथकाने बेळगाव केएसआरटीसीच्या जुन्या पार्किंगजवळील इंदिरा कॅन्टीन शेजारी सार्वजनिक ठिकाणी छापा टाकला. यावेळी गंगाधर नगर, शिंदोळी (बेळगाव) येथील राघवेंद्र गोपाल मुर्कटनाळ (वय ३६) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हेरॉईनची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

छाप्यात आरोपीच्या ताब्यातून ४५.१८ ग्रॅम हेरॉईन (अंदाजे किंमत ९ लाख रुपये) तसेच एक रेडमी मोबाईल फोन (किंमत ५०० रुपये) असा एकूण ९ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७६/२०२६ नोंद करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम ८(सी) व २१(बी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, ही यशस्वी कारवाई करणाऱ्या पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व सिसीबी पथकाचे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त तसेच पोलीस उपायुक्त (DCP) यांनी कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या दिशा होंडीला एक सुवर्ण, दोन रौप्य पदके

Spread the love  बेळगाव : नुकत्याच जयपुर येथे झालेल्या 42 व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *