Friday , July 3 2026
Breaking News

पक्ष संघटना बळकटीसाठी कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love

 

सहकाररत्न उत्तम पाटील ; बोरगाव मध्ये एस आय आर प्रशिक्षण

निपाणी (वार्ता) : मतदार यादी विशेष पुनर्परीक्षण उपक्रमामध्ये (एस आय आर) बूथ लेव्हल एजंट (बी एल ए) यांची जबाबदारी आहे. मतदार नोंदणी, दुरुस्ती आणि संघटन बळकटीकरण करण्यासाठी घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य माहिती पुरवून सहकार्य करावे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष संघटना बळकटीसाठी कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत संबंधितांना माहिती देणे गरजेचे असून त्यासाठी कार्यकर्त्यांचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे. मोहिमेअंतर्गत आपले मतदान कायम राखण्यासाठी सर्व मतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहकाररत्न उत्तम पाटील यांनी केले. बोरगाव येथील अरिहंत सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (शरदचंद्र पवार गट) एसआयआर आणि बीएलए प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला ते बोलत होते.
सरकारी शाळेचे शिक्षक (बीएलओ) आणि बूथ लेव्हल एजंट (बीएलए) प्रत्यक्ष मतदारांच्या घरी भेट देऊन त्यांना विहित नमुन्यातील फॉर्म उपलब्ध करून देण्यात येत आहेत. फॉर्ममध्ये मतदारांचे नाव, मतदान कार्ड क्रमांक, जन्मतारीख, आधार कार्ड क्रमांक, आई वडिलांचे नाव आवश्यक माहिती अचूक भरणे अनिवार्य आहे. तहसीलदार कार्यालयाकडून प्राप्त झालेले हे फॉर्म महत्त्वाचे असून, ते गहाळ होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन शिक्षण शिबिरात करण्यात आले.
प्रशिक्षण शिबिरास निपाणी मतदार संघातील पदाधिकारी, बूथस्तरीय कार्यकर्ते बोरगाव पट्टनपंचायतचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, नगरसेवक, ग्राम पंचायतचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, अरिहंत बँकेचे संचालक, पी.के.पी.एस संचालक, दूध डेअरी संचालक, विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, महिला मोर्चा सदस्या आणि मतदार उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव येथील अरिहंत सभागृहात उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Spread the love  निपाणी (वार्ता) : केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला ५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *