Saturday , August 22 2026
Breaking News

सैनिकरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र चौगुले यांचा कुर्ली येथे सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : सैनिक कल्याण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन कुर्ली येथील आजी-माजी सैनिक को-ऑप. मल्टीपर्पजच्या कुरली शाखेचे अध्यक्ष
राजेंद्र चौगुले यांना सैनिकरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यानिमित्त कुरली येथे त्यांचा पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले व मान्यवरांच्या हस्ते पर्यावरणपूरक पद्धतीने सत्कार करण्यात आला.
नामदेव चौगुले यांनी, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या तर्फे जाहीर करण्यात आलेला हा पुरस्कार राजेंद्र चौगुले यांच्या प्रदीर्घ देशसेवा, सहकार क्षेत्रातील नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेणारा मानाचा सन्मान असल्याचे सांगितले.
राजेंद्र चौगुले यांच्या नेतृत्वाखाली सैनिक बँकेने अल्पावधीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. अवघ्या १९ महिन्यांत ७ कोटी रुपयांच्या ठेवीं जमवून ५ कोटीचे कर्जवाटप केले आहे. कर्जाची १०० टक्के केली आहे. यावेळी सुरेश, घाटगे, नानासाहेब पाटील, सचिन कौंदाडे, के. डी. पाटील, शिवाजी पाटील, अमोल पाटील, संतोष उर्फ पिंटू पाटील, गणेश माळी, सुखदेव मगदूम अथर्व पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे देवचंद कॉलेज परिसरात बाकडी

Spread the love  निपाणी (वार्ता) : सामाजिक बांधिलकीची विचारधारा जपत जेष्ठ नागरिक सेवा संघा तर्फे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *