Saturday , August 22 2026
Breaking News

सांस्कृतिक कार्यक्रमामुळे व्यक्तिमत्त्व विकासाला चालना

Spread the love

 

अण्णासाहेब हावले; संजय कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये विविध कार्यक्रम

निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, एकोप्याची भावना, नेतृत्वगुण आणि सांस्कृतिक कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले कौशल्य सिद्ध करावे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना, नेतृत्वगुण आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे मत संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब आवले यांनी व्यक्त केले. येथील संजय कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये सांस्कृतिक उपक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
आठवडाभर विविध मनोरंजक व स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. होते. त्यामध्ये ट्रिन्स डे, ट्रेडिशनल डे, मिसमॅच डे, ब्लॅक अँड व्हाईट डे, बॉलिवूड डे, फूड स्टॉल (बिना तेल किंवा इंधन) इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत, नृत्य, खेळ नृत्यासह विविध मनोरंजनात्मक स्पर्धांचा समावेश होता.
या उपक्रमासाठी संस्थेच्या सीईओ ऐश्वर्या हवले, प्राचार्य डॉ. संदीप मुर्तले, प्रा. दर्शन पाटील, प्रीती पाटील, सुजित लाटवडे, रमेश हेगाजे, अपेक्षा कोगनोळे, प्राजक्त पाटील, अभिजीत मालगावे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विविध स्पर्धातील विजेत्यांना प्रमाणपत्रे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे देवचंद कॉलेज परिसरात बाकडी

Spread the love  निपाणी (वार्ता) : सामाजिक बांधिलकीची विचारधारा जपत जेष्ठ नागरिक सेवा संघा तर्फे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *