Friday , July 3 2026
Breaking News

श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेच्या कर्ज मेळाव्यास उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील महात्मा बसेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे बेळगाव येथील क्लब रोड हॉटेल इफा येथे दोन दिवसीय कर्ज मेळावा पार पडला. त्याला बेळगाव परिसरातील ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रारंभी कारंजी मठातील गुरुसिद्ध स्वामी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर व सिद्धेश्वर स्वामींच्या प्रतीमेचे पूजन झाले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकार रत्न डॉ.सी. बी कुरबेट्टी, अध्यक्ष किशोर बाली आणि मुख्य कार्यालयाच्या सह संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन व रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
संस्थापक अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांनी बेळगाव सारख्या स्मार्ट शहरात उद्योगधंदे वाढीसाठी आर्थिक बाबीची गरज असते.ती गरज येथील उद्योग व्यवसायांना देऊन त्यांच्या गरजा व जीवनमान उंचवण्यासाठी संस्थेतर्फे आर्थिक सहाय्य करून देशाच्या आर्थिक विकासासाठी चालना देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगितले. संचालक श्रीकांत परमने यांनी, संस्थेकडे 715 कोटी रुपयांच्या ठेवी असून कर्ज वितरण 480 केले आहे. संस्थेचे 60000 सभासद असून संस्थेने 5000 कोटीचा व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. संस्थेकडे 833 कोटी खेळते भांडवल असून संस्थेच्या 7 व मालकीच्या इमारती आहेत. 31 मार्चअखेर संस्थेस 10 कोटी 69 लाख रुपये निव्वळ नफा झाल्याचे सांगितले. अध्यक्ष किशोर बाली यांनी, बेळगाव येथील महेश्वरी अंधशाळेला 25 हजार रुपये देणगी जाहीर केली. मेळाव्यास 400 नव उद्योजक व्यापारी, बिल्डर्स, अभियंते डॉक्टरांनी सहभाग घेतला होता.
मेळाव्यात बेळगाव चेंबर्स ऑफ कॉमर्सचे संचालक राजेंद्र मोदगेकर बेळगाव क्रीडाइचे अध्यक्ष युवराज हुलजी, जिल्हा भाजप अध्यक्ष किरण जाधव, उद्योजक सुनील पाटील नवहिंद को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष व संचालकांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संचालक डॉ. एस. आर. पाटील श्रीकांत परमने, प्रताप पटनशेट्टी, सुरेश शेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, राजेश पाटील, दिनेश पाटील, संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टनशेट्टी, उमा पाटील, सी ईओ. एस. के. अदन्नावर असिस्टंट सीईओ महेश शेट्टी, चंद्रकांत हणबर, महादेव बडीगेर यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. सुरज घोडके यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत बेंदूर सणानिमित्त कर तोडणी कार्यक्रमाला मानकऱ्यासह नागरिकांची गर्दी

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजी राजे निपाणकर राजवाड्यामध्ये शेकडो वर्षापासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *