Saturday , August 22 2026
Breaking News

खानापूरमध्ये पाच दिवस पाणीपुरवठा बंद; टाक्यांची स्वच्छता व दुरुस्तीची कामे

Spread the love

 

खानापूर : खानापूर नगरपंचायतीमार्फत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठा टाक्यांची स्वच्छता तसेच आवश्यक किरकोळ दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने गुरुवार, दि. 2 जुलै ते सोमवार, दि. 6 जुलै 2026 या कालावधीत शहरातील नियमित पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांनी दिली.

या कालावधीत नागरिकांनी पिण्यासाठी कुपनलिकेचे (बोअरवेलचे) पाणी उकळून व थंड करूनच वापरावे, तसेच इतर दैनंदिन गरजांसाठीही कुपनलिकेच्या पाण्याचाच वापर करावा, असे आवाहन नगरपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यक तेवढ्या पाण्याचा साठा करून घ्यावा आणि नगरपंचायतीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामात सहकार्य करावे. या कामांमुळे होणाऱ्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल नागरिकांनी समजूतदारपणा दाखवावा, अशी विनंती मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

गर्लगुंजीतील माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; ४३ वर्षांनंतर एकत्र येत शाळांप्रती कृतज्ञता व्यक्त

Spread the love  गर्लगुंजी : गर्लगुंजी गावातील मराठी प्राथमिक शाळेच्या १९८१-८२ च्या इयत्ता सातवीच्या आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *