Tuesday , September 1 2026
Breaking News

बोरगाव येथील शांतीसागर सोसायटीला मार्चअखेर ४ लाख ८२ हजार रुपयांचा नफा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील आचार्य श्री १०८ शांतीसागर को-ऑप सोसायटीला मार्च २०२६ अखेर ४ लाख ८२ हजार रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, हालशुगरचे संचालक शरद जंगटे यांनी दिली. संस्थेच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जंगटे म्हणाले, संस्थेने पारदर्शक व शिस्तबद्ध कारभार करत ठेवीदारांचा विश्वास संपादन केला आहे. आर्थिक वर्षात संस्थेचे भाग भांडवल १३ लाख ९० हजार रुपये, ठेवी १० कोटी ६४ लाख ४० हजार, गुंतवणूक ३ कोटी ८८ लाख ९८ हजार रुपये, विविध बँक, संस्थामध्ये बचत व चालू खात्यावरील शिल्लक ६२ लाख ६३ हजार रुपये, कर्ज वाटप ६ कोटी ४९ लाख १८ हजार रुपये, अहवाल सालात ४ लाख ८२ हजार असून निव्वळ नफा झाला आहे. संस्थेच्या मुख्य कार्यालयासह मानकापूर येथे शाखा कार्यरत आहे. बेडकिहाळ व मांगूर या ठिकाणी शाखाना मंजुरी मिळाली असून लवकरच उद्घाटन कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य व्यवस्थापक वैभव कुंभार यांनी संस्थेतील विविध योजनांचा आढावा घेतला.
बैठकीस उपाध्यक्ष राजशेखर हिरेमठ, संचालक शीतल अम्मनावर, डॉ. महावीर बंकापुरे, सुनिल गोरखाडे, चौगुले, अर्जुन हुडेद, प्रकाश पाटील, अक्षय भिवरे, भूपाल महाजन, पद्मश्री पाटील, भारती सातपुते यांच्यासह संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

तिसऱ्या सोमवारी शिव मंदिरात हर, हर महादेवाचा गजर

Spread the love  शिवालयात दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी निपाणी (वार्ता) : श्रावण महिन्या निमित्त गेल्या दोनही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *