Thursday , August 20 2026
Breaking News

शालेय स्तरावर स्पर्धा परीक्षाना अधिक महत्व द्यावे

Spread the love

 

सबलेफ्टनंट सुयश नुल्ले; कुर्ली हायस्कूलमध्ये स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन

निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असतात. योग्य मार्गदर्शन व अभ्यास नियोजन नसल्यामुळे बरेच विद्यार्थी अयशस्वी होतात. यासाठी त्यांना शालेय स्तरावर स्पर्धा परीक्षांबाबत आवड निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत नाणीबाई चिखली येथील सबलेफ्टनंट सुयश नुल्ले यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात आयोजित पालक सभा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी स्कूल बेटरर्मेंट कमिटी अध्यक्ष अरुण निकाडे होते.
टी. एम. यादव यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भारतीय नौदलात सबलेफ्टनंट म्हणून निवड झालेबद्दल सुयश नुल्ले यांचा विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. नुल्ले म्हणाले विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत शिस्त, वेळेचे नियोजन, शारीरिक तंदुरुस्ती, देशप्रेम आणि चारित्र्य संवर्धन यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. पालकांना संबोधित करताना त्यांनी मुलांच्या गुणवत्तेची ओळख करून त्यांना योग्य दिशा, प्रोत्साहन आणि सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. मोबाईलचा मर्यादित वापर, नियमित अभ्यास, वाचनाची सवय आणि स्पर्धा परीक्षांची तयारी याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. भारतीय सशस्त्र दलांसह विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधी, त्यासाठीची पात्रता आणि आवश्यक तयारी यांची माहिती देत विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहून ती साकार करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची प्रेरणा दिली. रमजान कराडे यांनी पालकांच्या जबाबदारी बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मुख्याध्यापक एस. एस. चौगुले, नामदेव निकाडे, कुमार माळी, नवनाथ पाटील, नंदकुमार खोत, सुधाकर व्हराटे, यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. एस. एस. साळवी यांनी सूत्रसंचालन केले. पी व्ही कांबळे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

पहिल्या श्रावण सोमवारी शिवालये गजबजली

Spread the love  दर्शनासाठी दिवसभर गर्दी : विविध ठिकाणी शाबू खिचडीचे वाटप निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *