Thursday , August 20 2026
Breaking News

बेनाडी -पंढरपूर दिंडीचे १८ आयोजन; पायी दिंडीचे १६ जुलैला आयोजन

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : बेनाडी ते पंढरपूर पायी दिंडी १८ व्या वर्षी गुरुवारी (ता.१६) रवाना होणार आहे. त्याची तयारी पूर्णत्वाकडे आले असून वारकरी आणि भाविकांमध्ये दिंडीची आस लागून राहिली आहे.
गुरुवारी (ता.१६) सकाळी ११ वाजता शरद जोशी यांच्या पौरोहित्याखाली माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर पोवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्राम प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्यानंतर कारदगा, नरसिंहगाव, नागज, वाटंबरे संगेवाडी, कुरुंदवाड, हेरवाड, मिरज, बोरगाव, शेळकेवाडी, हतीत, बिलेवाडी फाटा कासेगाव मार्गे ही दिंडी पंढरपूरला पोहोचणार आहे. शनिवारी (ता.२५) मोहित्यांचे वडगाव येथील गायत्री निकम यांचे कीर्तन, गोरंबे येथील गुरुमाऊली भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. भडगाव येथील रामगौडा पाटील महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. विणेकरी म्हणून रामा पट्टणकडे, शिंग वादक म्हणून दिनकर गुरव, चोपदार म्हणून रमेश घाळीमट्टे, पालखी सेवक म्हणून मच्छिंद्र पट्टणकुडे, दिंडी चालक म्हणून यशवंत पाटील-सुळरगावकर हे काम पाहणार आहेत. याशिवाय बोळेवाडी येथील वारकऱ्यातर्फे हार्मोनियम, पखवाज आणि भजन सेवा होणार आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या भाविकांनी अण्णाप्पा पट्टणकुडे, आप्पासाहेब जनवाडे, भीमराव मधभावे, शिवा केरगुटे, रुपाक्ष सांगावे, विरूपाक्ष घाळीमट्टे, पिंटू सौंदत्ते, मल्लू रुद्रे, भाऊसाहेब पाटील -छायाप्पा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गळतगा स्मशानभूमी हिरवीगार करण्यासह बुद्धविहारात शांततेसोबत पक्ष्यांचा अधिवास

Spread the love  निपाणी (वार्ता) : भूमी वात्सल्य फाऊंडेशनतर्फे गळतगा येथील स्मशानभूमी परिसरात ५१ देशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *