Monday , June 29 2026
Breaking News

कर्नाटकमध्ये अवैध वास्तव्य करणाऱ्यांची संख्या १३,६७५; बेळगाव जिल्ह्यात ४५८ जण आढळले

Spread the love

 

बंगळूर : कर्नाटकात अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांची संख्या वाढत असल्याची माहिती राज्याच्या गृह विभागाच्या जिल्हानिहाय पाहणीत समोर आली आहे. या अहवालानुसार राज्यात एकूण १३,६७५ जण अवैधरीत्या राहत असल्याचे आढळून आले असून, बेळगाव जिल्ह्यात अशा ४५८ जणांची नोंद झाली आहे.

गृह विभागाने केलेल्या प्राथमिक पडताळणीत सर्वाधिक १०,६५० अवैध स्थलांतरित बंगळूर शहरात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर म्हैसूरमध्ये ८१० आणि बेळगाव जिल्ह्यात ४५८ जण आढळल्याने बेळगावचा राज्यात तिसरा क्रमांक लागतो.

याशिवाय मंगळूरमध्ये २६८, रामनगरमध्ये १९१, बळ्ळारीमध्ये ५३, चिक्कबळ्ळापूरमध्ये ३८, मंड्यामध्ये ३७, हुबळी-धारवाडमध्ये ३५, दावणगेरेमध्ये २०, रायचूरमध्ये १९, कोलारमध्ये १३, कोडगूमध्ये १०, कोप्पळमध्ये १०, गुलबर्गामध्ये ९, चित्रदुर्गमध्ये ८, हसनमध्ये ५ आणि चामराजनगरमध्ये ३ अवैध वास्तव्यास असलेले नागरिक आढळल्याची माहिती देण्यात आली आहे.

गृह विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, ही आकडेवारी प्राथमिक पाहणीवर आधारित असून प्रत्यक्षात अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्यांची संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तींची ओळख, कागदपत्रांची पडताळणी आणि आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

सेल्फी ठरली जीवघेणी; कावेरी नदीत एकाच कुटुंबातील चार महिलांसह चालकाचा बुडून मृत्यू

Spread the love  बंगळूर : कावेरी नदीच्या काठावर सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत एकाच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *