Monday , June 29 2026
Breaking News

देसूर येथे काँग्रेस कमिटीची बैठक; मतदार यादी अद्ययावत करण्यावर मार्गदर्शन

Spread the love

 

 

देसूर : मा. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली देसूर काँग्रेस कमिटीच्या वतीने मतदार यादी अद्ययावत करण्यासंदर्भात बीएलओ (BLO) बाबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती तसेच नवीन मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी बूथ पातळीवर कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान पक्षासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बूथ एजंटांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक व्यक्त केले.

या बैठकीस काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बूथ एजंट मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार उचगाव ब्लॉक युवा काँग्रेस अध्यक्ष व्यंकट पाटील यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

कॅम्प पोलीस ठाण्याचे नव्या इमारतीत स्थलांतर; उद्यापासून बीएसएनएल इमारतीतून सेवा

Spread the love  बेळगाव : शहरातील कॅम्प पोलीस ठाण्याचे सोमवार, दि. २९ जून २०२६ पासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *