Thursday , August 20 2026
Breaking News

कर्नाटकात गुटखा-पानमसाल्यावर लवकरच बंदीचे संकेत : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार

Spread the love

 

बंगळूर : कर्नाटक राज्यात पानमसाला आणि गुटख्यावर आगामी काही दिवसांत कठोर निर्बंध अथवा पूर्ण बंदी लागू करण्याचे संकेत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिले आहेत.

राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, उपलब्ध अहवालांनुसार पानमसाला आणि गुटखा उत्पादनांमध्ये अमली पदार्थांचे घटक आढळले आहेत. त्यामुळे संबंधित उत्पादकांना आधीच इशारा देण्यात आला आहे.

राज्य सरकारला सुमारे १०० कोटी रुपयांचा महसूल कमी झाला तरी चालेल, मात्र जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने पानमसाला आणि गुटखा उत्पादनांवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अमली पदार्थमुक्त कर्नाटक घडवणे हे सरकारचे उद्दिष्ट असून त्यासाठी सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री शिवकुमार यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

केपीएससी अध्यक्ष शिवशंकरप्पांना हायकोर्टाचा दिलासा; राज्यपालांचा निलंबन आदेश रद्द

Spread the love  बंगळूर : मुलीला सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी पदाचा गैरवापर आणि घराणेशाही केल्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *