Friday , August 21 2026
Breaking News

कंग्राळ गल्ली बेळगाव येथे पल्स पोलिओ मोहिमेचा उत्साहात शुभारंभ

Spread the love

 

बेळगाव : भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने २८ ते ३० जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला कंग्राळ येथील बूथ क्रमांक १९ (सावित्री बिल्डिंग) येथे रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मोहिमेला सकारात्मक सुरुवात मिळाली.

मोहिमेच्या प्रारंभी उपस्थित पहिल्या पाच बालकांना ज्येष्ठ नागरिक अनंतराव पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, गोपाळ निळकंठाचे, प्रीती सचिन पाटील तसेच अंगणवाडी शिक्षिका मालू निंगाप्पा बेळगावकर यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अंगणवाडी शिक्षिका मालू निंगाप्पा बेळगावकर, रेणुका यल्लाप्पा करेगार, संगीता संजय पाटील आणि माधुरी यल्लेश सुळगेकर यांनी मोहिमेपूर्वी कंग्राळ परिसरात घरोघरी भेटी देत व्यापक जनजागृती केली. प्रत्येक पाच वर्षांखालील बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लसीचे थेंब पोहोचावेत, यासाठी त्यांनी पालकांना सहकार्याचे आवाहन केले.

“एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये,” हा निर्धार व्यक्त करत, एखादे-दुसरे आजारी बालक वगळता कंग्राळ परिसरातील सर्व पात्र बालकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचा संकल्प अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. बालकांना पोलिओमुक्त आणि निरोगी भविष्य देण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

फाउंड्री क्लस्टरमध्ये गांजाची विक्री; उचगावच्या तरुणाला बेड्या

Spread the love  १ किलो २१२ ग्रॅम गांजासह मोटारसायकल, मोबाईल जप्त; १.०३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *