Thursday , August 20 2026
Breaking News

बेळगाव येथील वक्तृत्व स्पर्धेत मच्छेच्या माजी विद्यार्थ्याची चमक; पुष्कर कोलेकर याला द्वितीय क्रमांक

Spread the love

 

बेळगाव : छत्रपती शाहू प्रकाशन मंडळ, बेळगाव व राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मच्छे येथील माजी विद्यार्थी कु. पुष्कर परशराम कोलेकर याने द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

पुष्कर हा सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथील माजी विद्यार्थी असून सध्या तो ठळकवाडी हायस्कूल, टिळकवाडी, बेळगाव येथे शिक्षण घेत आहे. प्रभावी वक्तृत्व, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि विषयावरील सखोल अभ्यासाच्या जोरावर त्याने हे यश मिळवले.

या वक्तृत्व स्पर्धेमध्ये बेळगाव परिसरातील सुमारे ४० हायस्कूल विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल प्रा. डॉ. मधुकर जाधव यांच्या हस्ते पुष्करचा सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.

या यशासाठी त्याला ठळकवाडी हायस्कूलचे शिक्षक श्री. सी. वाय. पाटील सर तसेच सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथील मोदी टिचर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

पुष्करच्या या यशाबद्दल त्याचे पालक, शिक्षक, माजी शाळेचे शिक्षकवृंद तसेच परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मच्छे गावातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची परंपरा कायम राखत, पुष्करने आपल्या शाळेचा व परिसराचा गौरव वाढविला आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्रावणानिमित्त बंगळूर-बेळगाव-बंगळूर एक्स्प्रेसच्या दोन फेऱ्यांना आजपासून सुरुवात

Spread the love  बेळगाव : श्रावण महिन्यानिमित्त गावी येणाऱ्या नोकरदारांसह प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी नैऋत्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *