Thursday , August 20 2026
Breaking News

रामदेव हॉटेलजवळ धावत्या कारला अचानक आग; काही क्षणांतच कार जळून खाक

Spread the love

 

बेळगाव : शहरातील रामदेव हॉटेल समोरील डी-मार्ट कॉर्नरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी धावत्या स्विफ्ट कारला अचानक आग लागून काही क्षणांतच संपूर्ण वाहन जळून खाक झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, कार चालू असतानाच इंजिन भागातून अचानक धूर येऊ लागला आणि त्यानंतर काही क्षणांतच आगीने तीव्र रूप धारण केले. परिस्थिती लक्षात येताच चालक व कारमधील प्रवाशांनी प्रसंगावधान राखत तात्काळ वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून बाहेर उडी मारली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून सर्वजण सुखरूप बचावले आहेत.

अवघ्या 10 ते 15 मिनिटांत आगीने संपूर्ण कारला वेढा घातला आणि वाहन पूर्णपणे जळून खाक झाले. सदर कार बेळगाव पासिंगची असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत असून अधिकृत कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

About Belgaum Varta

Check Also

तंजावर येथील १ले सरफोजीराजे भोसले द्वितीय मराठी साहित्य संमेलनासाठी सीमाभागातून सहभागाचे नियोजन

Spread the love  बेळगाव : तामिळनाडूतील ऐतिहासिक तंजावर येथे दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *