Thursday , August 20 2026
Breaking News

अयोध्या श्रीराम मंदिर देणगी अपहार प्रकरण : अटक आरोपींच्या घरांवर पोलिसांचे छापे

Spread the love

 

अयोध्या (उत्तर प्रदेश) : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी अपहारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आठही आरोपींच्या निवासस्थानांवर रविवारी पोलिसांनी एकाचवेळी छापेमारी केली. सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.

स्थानिक दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या विशेष पथकांनी लव कुश मिश्रा, अविनाश शुक्ला, रामाशंकर यादव (टिन्नू यादव) यांच्यासह सर्व आरोपींच्या घरांची झडती घेतली. छापेमारीदरम्यान तपासासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अन्य पुरावे गोळा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यापूर्वी अयोध्या न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आठ आरोपींना २९ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. देणगी निधीच्या कथित अपहारासंदर्भात पोलिसांकडून आर्थिक व्यवहार आणि संबंधित कागदपत्रांची सखोल चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, चौकशीनंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

टँकरची ऑटो रिक्षाला धडक; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love  शेतीचे काम आटोपून घरी परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला; ७ हून अधिक जण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *