Sunday , July 26 2026
Breaking News

बोरगाव येथे गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत हिंदू महासंमेलनाचे आयोजन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सकल हिंदू समाज बोरगाव यांच्यातर्फे गुरुवारी (ता.१४) बोरगाव येथे हिंदू संमेलन होणार आहे. भारत देश हा हिंदू राष्ट्र असून याच देशात हिंदू जनजागृतीसाठी प्रयत्न करीत असल्याचे लाजिरवाणी गोष्ट आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हुपरी तालुका प्रमुख सुनील सुतार यांनी दिली. संमेलन पूर्व येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
सुनील सुतार म्हणाले, शंभर वर्षी पूर्वी स्थापन केलेल्या या संघाकडून संपूर्ण देशभरात हिंदू धर्मजागृती करण्यात येत आहे. बोरगाव येथे १४ रोजी हिंदू संमेलन होणार आहे. या संमेलनास सिद्धांत चक्रवर्ती १०८ कुलरत्न मुनी महाराज व हंचिनाळ येथील महेशानंद स्वामी यांचे सानिध्य लाभणार आहे. सामाजिक कार्यकर्ते राजशेखर हिरेमठ हे अध्यक्ष असणार आहेत. तर प्रमुख वक्त्या म्हणून मैत्री गोडसे यांचे कुटुंब प्रबोधनावर व आरएसएस इचलकरंजी येथील प्रमुख भगतरामजी छाबडा यांचे पंचपरिवर्तन या विषयावर व्याख्यान होणार आहे. बोरगाव शहरासह ८ गावातील आरएसएसचे प्रमुख व हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे सांगीतले.
हालशुगर संचालक शरद जंगटे यांनी, हे संमेलन राजकारण व जातपात विरहित असणार आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी संमेलन आयोजित केले असून सर्वांनी या संमेलनात सहभागी व्हावे. संमेलनापूर्वी शहरातून सवाद्य मिरवणूक, शोभायात्रा निघणार आहे. यामध्ये बारा घोडे, उंट, रथ विविध पारंपारिक वाद्य असणार आहेत. प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरात रांगोळी काढणे, भगवे ध्वज लावणे हे कार्य करणार असून संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शांतानंद प्रसाद महाराज, प्रचार प्रमुख श्रेयस ढाणे, बी. के महाजन राजू भदरगडे, शिवाजी कदम, विश्वास नाईक, गणेश वास्कर, निलेश नाझरे, नितीन तोडकर, शंकर गुरव, संजय महाजन, अमित फाकांडे, उदय महाजन श्रीपाल गोसावी, शिशु एदमाळे, महीपती खोत, राजू कुंभार, बाळासाहेब उरणकर, अजित तेरदाळे, बबन रेंदाळे, बाहुबली पाटील यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *