Sunday , July 26 2026
Breaking News

शिंदोळीत भरदिवसा दीड लाखांची घरफोडी, दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Spread the love

 

बेळगाव : शिंदोळी गावातील महालक्ष्मीपूरम परिसरात भरदिवसा घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप उचकटून सुमारे 1 लाख 34 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी विजयलक्ष्मी शिवराम मिरजकर यांनी मारिहाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

शनिवारी तारीख 9 रोजी सकाळी सहाच्या सुमारास मिरजकर कुटुंबीय घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप धारदार किंवा लोखंडी वस्तूच्या साह्याने उचकटले. त्यानंतर घरात प्रवेश करून त्यांनी थेट बेडरूम गाठले. घरातील कपाटे व साहित्य अस्ताव्यस्त फेकून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांचा शोध घेतला. कपाटात ठेवलेले सुमारे 42 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यांनी लंपास केले.
यात मंगळसूत्र, कर्णफुले, चेन आधी स्वरूपाच्या दागिन्यांचा समावेश आहे.सायंकाळी कुटुंबीय घरी आल्यावर घराचा दरवाजा उघडा व आतील सामान्य विस्कळीत अवस्थेत दिसून आले. कपाटातील दागिने गायब झाल्याचे लक्षात येतात कुटुंबीयांना धक्का बसला त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती कळवली.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *