Sunday , July 26 2026
Breaking News

हेस्काॅम एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर यांच्याकडून शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्यास सुरुवात

Spread the love

 

बेळगाव : गेल्या आठ दिवसांपासून अनगोळ शिवारातील वासोजी यांच्या शेतातील टिसी जळल्याने परिसरातील शेतकऱ्यांची पीकं करपू लागल्याने टिसी तात्काळ बदलावी तसेच येळ्ळूर-शहापूर शिवाराला विद्युत पुरवठा करणारा टिसी येळ्ळूर रस्त्यावर बसवावा तसेच जिर्ण झालेल्या मुख्य वाहिन्या बदलाव्या, वाकलेले खांब सरळ करुन लोबंकळणाऱ्या वाहिन्या ठेवाव्यात तसेच इतर समस्या घेऊन येथील शेतकरी हेस्काॅमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर सुतार यांना निवेदन देत गाऱ्हाणे मांडताच ताबडतोब संबंधित कर्मचारी वर्गाला आदेश देऊन जास्त दाबाचा टिसी ताबडतोब बदलण्यासाठी आदेश देऊन शेतकऱ्यांची करपणारी पीकं वाचवा तसेच येत्या पावसाळ्याआधी येळ्ळूर रस्त्यावरही जास्त दाबाचा टिसी घालून मुख्य वाहिन्या नवीन घाला तसेच खांबही सरळ करुन देण्याचे आश्वासन दिले. यामुळे निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना समाधान झाले.

यावेळी राजू मरवे, गोपाळ सोमनाचे, महादेव कुगजी, परशुराम पाटिल, मारुती बुद्रुक, हिराचंद चौगले, तेथून पाटील, जाधव, यल्लूप्पाचे, टुमरीसह अनगोळ, शहापूर, येळ्ळूर शिवारातील अनेक शेतकरी हजर होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *