Friday , April 17 2026
Breaking News

खासगी बस आणि कारची समोरासमोर धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू

Spread the love

 

यादगीर :  खासगी बस आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. कर्नाटकच्या यादगिरी जिल्ह्यात शुक्रवारी ही घटना घडली. धडक बसल्यानंतर कारने पेट घेतला. या आगीत कारमधील सहा जण होरपळले.

फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, कार यादगिरीहून रायचूरच्या दिशेने जात होती, तर बस बंगळुरूवरून कलबुर्गीकडे चालली होती. अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अपघातात कारमधील सर्वांचा मृत्यू झाला तर बसमधील काही प्रवाशांना किरकोळ जखम झाली. अपघातात बसच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे.

अपघातानंतर परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. आपत्कालीन पथकांनी परिस्थिती नियंत्रणात आणून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

आदिचुंचनगिरी मठातील ‘नऊ तत्त्वे’ विकसित भारताचा मार्ग

Spread the love  पंतप्रधान नरेंद्र मोदी; आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन बंगळूर : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *