Monday , September 21 2026
Breaking News

हिंडलगा कारागृहावर एडीजीपी आलोक कुमार यांच्या नेतृत्वाखाली अचानक धाड

Spread the love

 

बेळगाव : हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात सुरू असलेल्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आलोक कुमार यांच्या नेतृत्वाखाली अचानक धाड टाकण्यात आली. या कारवाईमुळे कारागृह प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

हिंडलगा कारागृहात वाढत चाललेल्या अवैध प्रकारांच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने ही मोठी कारवाई हाती घेतली. आलोक कुमार यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ५२ पोलीस कर्मचाऱ्यांसह बेळगाव शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी या धाडीत सहभागी झाले होते.

या कारवाईदरम्यान कारागृहात सखोल तपासणी करण्यात आली. सुमारे दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या सर्च ऑपरेशनमध्ये कैद्यांच्या सेलची तपासणी करण्यात आली. यावेळी दोन श्वान पथकांचीही मदत घेण्यात आली. तपासणीदरम्यान एक सिगारेट पाकीट तसेच जिमसाठी वापरले जाणारे डंबेल्स आढळून आले.

धाडीदरम्यान आढळलेल्या काही त्रुटींवरून आलोक कुमार यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा न घातल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर किरकोळ शिस्तभंग कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

गेल्या काही वर्षांपासून हिंडलगा कारागृहात धमकीचे फोन, गुटखा व अमली पदार्थांचा वापर, तसेच मोबाईलचा गैरवापर यांसारख्या गंभीर तक्रारी समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर ही धाड टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कारागृहातील शिस्त प्रस्थापित करून गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *