Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणीसह परिसरात शिव-बसव जयंती, अक्षय तृतीयेच्या तयारीची लगबग

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : शिव-बसव जयंती आणि अक्षय तृतीयेला केवळ दोन दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. शिव- बसव जयंतीसह अक्षय तृतीया सणाच्या तयारीची शहरासह ग्रामीण भागात लगबग दिसून येत आहे. येथील बाजारपेठेत जयंतीसाठी लागणारे नानाविध आकाराचे भगवे ध्वज आणि त्यावर शिव -बसव प्रतिमा असणारे ध्वज विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. विविध तरुण मंडळ आणि सार्वजनिक उत्सव मंडळांनी दोन दिवसापासून अशा ध्वजांची खरेदी सुरू केली आहे.
बाजारपेठेत विविध भागात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमाही विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
जयंतीच्या निमित्ताने शहर आणि उपनगरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय अनेक मंडळांनी विविध किल्ल्यावरून ज्योत आणून शिवजयंती साजरी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ५० रुपयापासून ५०० रुपयापर्यंत ध्वजांची खरेदी-विक्री सुरू आहे. बालचमूकडून लहान आकाराचे ध्वज खरेदी करण्यात येत आहेत.
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोने, वाहन खरेदीची परंपरा आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेकजण सोने, वाहन, घर खरेदीला पसंती देतात. तर यावेळी लग्नसराईचा धूमधडाका आहे. यंदा सोने लाखोच्या घरात गेले असले तरी लग्नकार्य आणि गुंतवणुकीसाठी सोन्याचा आसरा घेतला जात आहे. आता अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या या सणासाठी सराफ व्यावसायिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव्या डिझाईन सोबत नवीन ऑफरही ग्राहकांना दिल्या आहेत. यासाठी बुकिंगही सुरू केली असून ग्राहकांचा प्रतिसाद मिळू लागल्याची महिती सराफ व्यावसायिकांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *