निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील युवा नेते उत्तम रावसाहेब पाटील सहकार क्षेत्रातील कार्याबद्दल कर्नाटक राज्य सहकार क्षेत्रातर्फे ‘सहकार रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सोमवारी (ता.२०) विजापूर येथे झालेल्या सहकार सप्ताह समारोप कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक रावसाहेब पाटील (दादा) यांना …
Read More »शेतकऱ्यांनी गडबड करून उसाला तोड देऊ नये
राजू पोवार; ऊस दराबाबत जनजागृती बैठक निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल, बी- बियाणे, मजुरी, खतांचे दर वाढत आहेत. त्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. दरवर्षी कारखान्यांना जाणाऱ्या उसामुळे कारखानदार मोठे झाले असून शेतकरी रसा तळास जात आहे. खर्चाच्या तुलनेत ऊसाला दर देण्याची मागणी करूनही त्याकडे कारखान्यानी दुर्लक्ष केले …
Read More »बदली प्रकरणात पैसे घेतल्याचे सिध्द झाल्यास राजकीय निवृत्ती
सिद्धरामय्यांचा पुनरुच्चार; कुमारस्वामींच्या काळात बदली घोटाळ्याचा आरोप बंगळूर : सरकारी अधिकाऱ्यांच्या एका जरी बदली प्रकरणात पैसे घेतल्याचे सिध्द झाल्यास राजकारणातून निवृत्त होईन, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रविवारी केला. सिध्दरामय्या आणि त्यांचा मुलगा व माजी काँग्रेस आमदार यतींद्र यांच्यावर ‘कॅश फॉर ट्रान्सफर’ रॅकेटचा धजदचे प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी सतत …
Read More »राज्यात ४० पोलिस उपाधीक्षक, ७१ निरीक्षकांच्या बदल्या
बेळगाव : शासनाने बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील पोलिस उपाधीक्षक आणि निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश बजावला आहे. राज्यातील ४० उपाधीक्षक आणि ७१ पोलिस निरीक्षकांचा यात समावेश आहे. खानापूर येथील पोलिस ट्रेनिंग स्कूलचे उपअधीक्षक एस. डी. सत्यनायक यांची राज्य गुप्तवार्ता विभागात नियुक्ती झाली असून, त्यांच्या जागी कर्नाटक लोकायुक्त विभागाचे उपअधीक्षक निलाप्पा ओलेकार यांची …
Read More »व्हीएसएम जी. आय. बागेवाडी शाळेत बाल दिनानिमित्त जुन्या खेळांना उजाळा
निपाणी (वार्ता) : येथील व्हीएसएम जी. आय. बागेवाडी प्राथमिक शाळेत बाल दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी जुन्या खेळांना उजाळा दिला. प्रारंभी डॉ. एस. बी. पाटील, प्राचार्य डॉ. एन. एस. मादनावर, वाय. बी. हंडी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. डॉ. एस. …
Read More »ममदापूर तुळजाभवानी मंदिरात हजारो दिव्यांनी कार्तिक दीपोत्सव
निपाणी (वार्ता) : ममदापूर (के.एल) येथे श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर यांनी स्थापन केलेल्या प्रति तुळजाभवानी मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला त्यानिमित्त मंदिर परिसर हजारो दिव्यांनी उजळून निघाला होता. आप्पासाहेब पुजारी यांनी स्वागत केले. त्यानंतर श्रीमंत दादाराजे निपाणकर व श्रीमंत सम्राज्यलक्ष्मीराजे निपाकर यांच्या हस्ते दीपस्तंभाचे पूजन झाले. दीपस्तंभ आणि मंदिर परिसरात …
Read More »खानापूर येथील कॅनरा बँकेच्या शाखेला आग
खानापूर : खानापूर येथील कॅनरा बँकेच्या शाखेला अचानक आग लागली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बँकेचे महत्त्वाचे कागदपत्रे कम्प्युटर व फर्निचर इत्यादी वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत. सुदैवाने पैसे ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम पर्यंत आग पोहोचू शकली नाही. अग्निशामक दल या ठिकाणी दाखल झाले असून आग …
Read More »आर. अशोक यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड
राज्यात पक्ष अधिक मजबूत करण्याचा निर्धार बंगळूर : वक्कलिगचे प्रभावशाली नेते, माजी उपमुख्यमंत्री व पद्मनाभनगर येथील आमदार आर. अशोक यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. बैठकीत माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अशोक यांचे नाव सुचवले, तर आमदार सुनील कुमार यांनी त्यास अनुमोदन दिले. भाजपचे …
Read More »शिवकालीन शस्त्रास्त्रे पाहून शिवप्रेमीत संचारला उत्साह
पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला प्रचंड गर्दी खानापूर : खानापूर येथील शिव स्वराज जनकल्याण फाउंडेशनतर्फे लोकमान्य भवन येथे शुक्रवारपासून आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तसेच शस्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी शनिवारी व रविवारी अनेक शाळांनी विशेष सहलींचे नियोजन केले आहे त्यामुळे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी होण्याची …
Read More »कांदा रोपाला आला भाव!
एकरासाठी २५ हजारांचा खर्च; कांदा लागवडीकडे कल निपाणी (वार्ता) : ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये परतीचा पाऊस झालाच नाही. त्यामुळे कांद्याची रोपे पाणी देऊन जगवावी लागली. तर तरुचे उत्पादन कमी झाल्याने लागवडीवर परिणाम होत आहे. सध्या कांद्याच्या दराने पन्नाशी पार केली असली तरी कांदा शिल्लक नाही. त्यामुळे पुढील हंगामात तरी उत्पादन …
Read More »