Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

ढोणेवाडीत रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ओळखपत्राचे वाटप

  निपाणी (वार्ता) : ढोणेवाडी आणि परिसरात गजानन महाराज प्रकट दिन साजरा झाला. ढोणेवाडीत आयोजित कार्यक्रमास कर्नाटक राज्य रक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. आप्पा महाराजांच्या मठात आयोजित कार्यक्रमात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी राजू पोवार यांनी आपला सहभाग नोंदवून स्वतः अभंगाचे एक चरण …

Read More »

बॉम्बस्फोट प्रकरणाचा सुगावा लागल्याचे गृहमंत्र्यांचे संकेत

  महत्त्वाची माहिती उपलब्ध झाल्याचा दावा बंगळूर : व्हाईटफिल्डच्या रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाची सर्व परिमाणात चौकशी केली जात असून काही महत्त्वाची माहिती उपलब्ध झाली आहे, असे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सांगितले. हे प्रकरण सीसीबीकडे सोपवण्यात आले आहे. विशेष पोलिस पथकाने तपास तीव्र केला आहे. एनआयए आणि एनएसजी पथकेही तपास …

Read More »

कन्नडसक्ती विरोधात म. ए. युवा अधिकृत समिती निपाणीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

  निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा अधिकृत समिती निपाणी विभागाच्या वतीने आज तहसीलदार निपाणी यांना कन्नडसक्तीबाबत निवेदन दिले. धारवाड खंडपिठाच्या व केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या निकालानुसार वादग्रस्त सीमाभागातील मराठी भाषिक व्यापाऱ्याना आस्थापनेवर त्यांच्या भाषेतुन बोर्ड लावण्याचा कायदेशीर अधिकार दिलेले आहेत. सध्या कन्नडची सक्ती सुरु आहे ती तात्काळ थांबविण्यात यावी, निपाणी …

Read More »

अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ऑपरेशन मदत ग्रुप व इनरव्हिल क्लबवतीने शैक्षणिक मदत

  खानापूर : ‘ग्रामीण शिक्षण अभियान’ अंतर्गत खानापूर तालुक्यातील भिमगड अभयारण्यक्षेत्रात येणाऱ्या अतिदुर्गम भागातील हेमाडगा, पाली व मेंडील या गावातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना ‘ऑपरेशन मदत’ ग्रुप व इनरव्हिल क्लब बेळगांवच्या वतीने शैक्षणिक साहित्याची मदत. भिमगड अभयारण्यक्षेत्रात येणाऱ्या अतिदुर्गम भागातील हेमाडगा, पाली व मेंडील या खानापूर तालुक्यापासून 30/31 किमी दूर गावातील …

Read More »

कोगनोळी दूधगंगा नदीवरील विद्युत मोटरीची चोरी

  कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जवळ असणाऱ्या दूधगंगा नदीवरील विद्युत मोटरी चोरी झाल्याची घटना शुक्रवार तारीख 1 रोजी उघडकीस आली. याबाबत अधिक माहिती अशी की, महामार्ग लगत असणाऱ्या दूधगंगा नदीवर कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, वंदुर, करनूर येथील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटरी आहेत. गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी वारंवार विद्युत …

Read More »

बंगळूरच्या प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये मोठा स्फोट, ४ जखमी

  बंगळुरू : बंगळूरमधील राजाजीनगर येथील रामेश्वरम कॅफेमध्ये मोठा स्फोट झाला आहेत. यात किमान ४ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. बंगळूरच्या व्हाईटफील्ड येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत. या स्फोटातील जखमींमध्ये तीन कर्मचारी आणि एका ग्राहकाचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, दुपारी एकच्या सुमारास एका पिशवीत ठेवलेल्या …

Read More »

चन्नेवाडीच्या समृद्धी पाटील हिने कमावले सुवर्ण पदक

  खानापूर : पॉंडीचेरी येथे 27 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान केंद्र सरकारच्या “खेलो इंडिया” स्पर्धेअंतर्गत भारतीय त्वायकांदो फेडरेशन व पॉंडीचेरी स्पोर्ट्स असोसीएशन यांनी आयोजित केलेल्या, 52 किलो “त्वायकांदो” या स्पर्धा प्रकारात मूळ चन्नेवाडी ता. खानापूर व सध्या रा. फोंडा गोवा येथील कुमारी समृद्धी शिवाजी पाटील हिने सुवर्णपदक पटकावले, तिला …

Read More »

शॉर्टसर्किटमुळे ट्रॅव्हल बस जळून खाक; संकेश्वरजवळील घटना

  सुदैवाने ४० जणांचे प्राण वाचले निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर संकेश्वरनजीक सोलापूर गेटजवळ आज (शुक्रवार) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्स बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यामध्ये किंमती साहित्य तसेच संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने चालक, क्लीनरसह 40 प्रवाशांचे प्राण वाचले. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, मुंबई …

Read More »

जातनिहाय जनगणनेचा अहवाल राज्य सरकारला सादर

  मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय घेणार बंगळूर : बहुचर्चित जातनिहाय गणती (कर्नाटक सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण) अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. वीरशैव लिंगायत आणि वक्कलीग समुदायांच्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर स्थायी मागास आयोगाचे अध्यक्ष के. जयप्रकाश हेगडे यांनी गुरुवारी कांतराज समितीच्या डेटाच्या आधारे तयार केलेला अहवाल अधिकृतपणे मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या उत्तरादरम्यान विरोधकांचे धरणे, सभात्याग कागदपत्रे फाडून संताप व्यक्त

  बंगळूर : विधानसौधमध्ये पाकिस्तान समर्थक घोषणा देणाऱ्यांना हजर करावे, या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्य सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी करत काल विधानसभेत आंदोलन सुरू ठेवलेल्या भाजप आमदारांनी आजही धरणे आंदोलन पुढे चालूच ठेवले. सभागृदात कागदपत्रे फाडून सरकारविरोधात घोषणाबाजी केली व मुख्यमंत्र्यांच्या उत्तरादरम्यान सभात्याग केला. आज सकाळी सभागृहाचे कामकाज …

Read More »