राजेंद्र वडर -पवार : कोल्हापूर येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम निपाणी (वार्ता) : समाजात चांगले काम करणाऱ्यांची संख्या विरळ आहे. विविध क्षेत्रात आपले काम सांभाळत समाजकारण करणारे लोक कमी आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देण्याचे काम क्रांतीसूर्य फाउंडेशनने केले आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे …
Read More »मोहनलाल दोशी विद्यालयामध्ये चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल)येथील मोहनलाल दोशी विद्यालयामध्ये स्व. पद्मभूषण देवचंदजी शाह यांच्या स्मरणार्थ आंतरशालेय चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण मंडळाचे संचालक प्रकाश शाह उपस्थित होते. मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले यांनी ‘कलेमध्ये माणसाचे मन वेडावून टाकण्याचे सामर्थ्य असते. कला ही माणसाच्या …
Read More »साखरमंत्र्यांच्या वक्तव्यामुळेच शेतकऱ्याची आत्महत्या
मृतदेह दवाखान्यासमोर ठेवून रयत संघटनेचे आंदोलन ; १ कोटी रुपये भरपाईची मागणी निपाणी (वार्ता) : राज्याचे साखर मंत्री शिवानंद पाटील त्यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळेच हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव तालुक्यातील शाबाज मधील शेतकरी चंद्रप्पा चंद्रापूर यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये व त्यांच्या वारसांना शासकीय नोकरी …
Read More »केएसआरटीसी अपघात नुकसान भरपाई तीन लाखांवरून दहा लाख रुपये
बंगळूर : कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक जानेवारी २०२४ पासून अपघात मदत निधी ट्रस्टने द्यावयाची भरपाई तीन लाख रुपयांवरून दहा लाख रुपये केली आहे. अपघातग्रस्तांच्या आश्रितांना अतिरिक्त भरपाई देण्यासाठी केएसआरटीसी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ५० ते ९९ रुपये आणि १०० रुपयांच्या तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून प्रत्येकी १ रुपये …
Read More »कॉंग्रेसला कमी समजण्याची चूक करू नका
विजयेंद्र; नूतन पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक, लोकसभा निवडणुकीत एकजुटीचे आवाहन बंगळूर : राज्यात आणि देशात भाजप समर्थक लाट असल्याचे प्रतिपादन करून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. अशावेळी विरोधकांना हलके न घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. येथील …
Read More »खानापूर-हेमाडगा रस्त्याचे काम सुरू; मात्र रस्त्याची पुनर्बांधणी करावी : आबासाहेब दळवी
खानापूर : हेमाडगा रस्ता डागडुजीचे काम प्रशासनाने हाती घेतल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते व सरचिटणीस आबासाहेब दळवी तसेच मणतुर्गा, नेरसा, शिरोली या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र हा रस्ता तात्पुरता दुरुस्ती न करता पुनर्बांधणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केली …
Read More »दुचाकीस्वाराला वाचविताना बस पलटी
गळतगा जवळील घटना; अनेक प्रवाशांना दुःखपत निपाणी (वार्ता) : समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला चुकविताना कर्नाटक बस बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूस असलेल्या नाल्यात पलटी झाली. ही घटना बुधवारी (२७) सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून बसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. केवळ दैव …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थतज्ञ आहेत का? : सिध्दरामय्यांचा सवाल
रोजगाराची हमी पूर्ण न केल्याबद्दल ताशेरे; ‘युवानिधी’ योजनेला चालना बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकारच्या पाच हमी योजनांवर टीका केल्याबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला केला आणि ते अर्थतज्ज्ञ आहेत का, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. दहा वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देऊ न शकल्याबद्दलही …
Read More »दिगंबराच्या जयघोषात आडी दत्त मंदिरात दत्त जयंती
लाखो भाविकांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : पौर्णिमा निर्दोष असते. तसे आपले मन निर्दोष असावे. सद्गुरुस्वरूप दैवत मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त स्वरूपात अवत्तीर्ण झाले. जगात भाषा, जातीच्या द्वारे भेदाने कलह माजला आहे. माणसाला अभेद ज्ञानाकडे वळविण्यासाठी हा उत्सव आहे. जगातील भेद संपविण्यासाठी परमाब्धी ग्रंथ अभ्यासणे व आचरणात आणणे आवश्यक आहे. माणसाचे …
Read More »पाणी प्रश्नी बैठकीचे नियोजन न केल्यास धरणे सत्याग्रह
नगरसेवक विलास गाडीवड्डर; नगरपालिका आयुक्तांना निवेदन निपाणी (वार्ता) : गेल्या आठवड्यामध्ये शहरातील पाणी प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी जैन इरिगेशन आणि केएआयूडईसई अधिकाऱ्यांची नगरपालिकेत बैठक बोलवण्यात आली होती. पण त्यावेळी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठा संदर्भात कोणतीच उत्तरे देता आली नव्हती. त्यामुळे मंगळवारी (ता.२६) पुन्हा अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. पण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta