Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

गर्लगुंजी -इदलहोंड रस्त्याची दयनीय अवस्था

  खानापूर : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी -इदलहोंड या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या पाच वर्षात या रस्त्याच्या दुरूस्तीकडे लोकप्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे या गर्लगुंजी-इदलहोंड रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यातही या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले. त्यामुळे डांबरीकरणाचा पत्ताच नाही. गर्लगुंजी-इदलहोंड रस्त्यावरून नेहमी वीटा, …

Read More »

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी रयत संघटनेतर्फे हुबळी हेस्कॉमवर मंगळवारी मोर्चा

  निपाणी (वार्ता) : शेती पिकासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारींना सलग १६ तास वीज पुरवठा व्हावा, आतापर्यंत शॉर्टसर्किटने जळालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला योग्य नुकसान भरपाई मिळावी, उघड्यावरील ट्रान्सफॉर्मर आणि फ्युज पेट्यांचा बंदोबस्त करावा, यासह विविध मागण्यांसाठी चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे हुबळी हेस्कॉम कार्यालयावर मंगळवारी (२९) मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. …

Read More »

दूधगंगा नदीवरील विद्युत मोटारींची चोरी 

  कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या दूधगंगा नदीवरील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारींची चोरी झाल्याची घटना शुक्रवार ता. 25 रोजी उघडकीस आली. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटरी दूधगंगा नदी काठावर बसवण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री अज्ञात चोट्यांच्या कडून 20 …

Read More »

निपाणीत महिनाभरात दुसऱ्यांदा लोकायुक्तांची धडक

  चार तक्रारी दाखल; कामे न होण्यासह लाचेची मागणी निपाणी (वार्ता) : शहरातील महसूल खात्यासह विविध सरकारी कार्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांची कामे होण्यासाठी अनेक अधिकारी आणि कर्मचारीअडचण करत आहेत. शिवाय कामासाठी लाच मागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पार्श्वभूमीवर जिल्हा लोकायुक्त हनुमंतराया व सहकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.२५) दुपारी येथील शासकीय विश्रामधामात अचानक भेट …

Read More »

खानापूर तालुका गुरुकृपा वारकरी सांप्रदाय मल्टिपर्पस को-ऑप. सोसायटीच्या अध्यक्षपदी ह.भ.प. शांताराम गं. हेब्बाळकर तर उपाध्यक्ष पदी ह.भ.प. विठोबा बा. सावंत यांची निवड

  खानापूर : खानापूर तालुका गुरुकृपा वारकरी सांप्रदाय मल्टिपर्पस को-ऑप. सोसायटीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा ह.भ.प. शांताराम गं. हेब्बाळकर तर उपाध्यक्ष पदी ह.भ.प. विठोबा बा. सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्ष पदासाठी सूचक म्हणुन ह.भ.प. इंदुबाई ना. बंगलेकर व अनुमोदक म्हणून ह.भ.प. पुन्नाप्पा चि. बिर्जे तर उपाध्यक्ष पदासाठी सूचक म्हणुन …

Read More »

चिखली बंधाऱ्यातून निपाणी तलावात पाणी आणण्याच्या हालचाली

  आयुक्तासह अधिकाऱ्यांची चिखली बंधाऱ्याला भेट : यंदा पाऊस कमी झाल्याचा परिणाम निपाणी (वार्ता) : दरवर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसामुळे येथील जवाहर तलाव तुडुंब भरून वाहत होता. पहिल्यांदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने जवाहर तलावाने तळ गाठला आहे. मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे वेदगंगा नदीपासून यमगरणी जॅकवेलद्वारे जव्हार तलावात पाणी …

Read More »

मेतगेत २८ पासून सद्गुरु बाळूमामांचा ५७ वा पुण्यतिथी उत्सव

  हरिनाम सप्ताहाचे आयोजन; रनखांब खुला केल्याने भाविकांची गर्दी निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, गोवा आणि कोकण अशा भागातून येणाऱ्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मूळक्षेत्र मेतगे (ता. कागल) येथे श्री सद्गुरु बाळूमामांच्या ५७ व्या पुण्यतिथी निमित्त सोमवार( ता. २८ ऑगस्ट) ते सोमवार (ता.४ सप्टेंबर) अखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …

Read More »

भाग्यलक्ष्मी सौहार्दतर्फे सत्कार समारंभ

  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील मलगोंडा जनवाडे यांची बेडकिहाळ येथील बी. एस. कंपोझिट हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदी निवड झाली आहे. सत्याप्पा हजारे यांची ग्रामपंचायत अध्यक्षपदी त्या रूपाध्यक्षपदी मयुरी मंगावते यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा बेनाडी येथील भाग्यलक्ष्मी सौहार्द संस्थेतर्फे अध्यक्ष शंकर जनवाडे, रेखा जनवाडे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात …

Read More »

बुदलमुखमध्ये शामराव जाधवांच्या स्मृतींचे जतन व्हावे

  ग्रामस्थातर्फे शोकसभा; गावात वाचनालय सुरू करण्याचा मानस निपाणी (वार्ता) : बुदलमुख गावच्या हितासाठी, विकासासाठी कष्ट घेतलेल्या शामराव जाधव यांच्या निधनाने पंचक्रोशीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नावाने गावात वाचनालय सुरू करून किंवा त्यांच्या नावे साहित्यिक पुरस्कार योजना राबवल्यास ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विचार बुदलमुख …

Read More »

मानवी रक्ताशिवाय पर्याय नाही : प्राणलिंग स्वामी

  विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे रक्तदान शिबिर निपाणी (वार्ता) : जगात सर्वच गोष्टीचा विज्ञानाने शोध लावला आहे. पण मानवी रक्ताचा शोध किंवा निर्माण करणे विज्ञानाला जमलेले नाही. म्हणून रक्तदान करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने वर्षात़ून किमान दोन वेळा रक्त दान केले पाहिजे. रक्तदान हेच आजचा युगातील …

Read More »