Monday , September 21 2026
Breaking News

भाग्यलक्ष्मी सौहार्दतर्फे सत्कार समारंभ

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील मलगोंडा जनवाडे यांची बेडकिहाळ येथील बी. एस. कंपोझिट हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदी निवड झाली आहे. सत्याप्पा हजारे यांची ग्रामपंचायत अध्यक्षपदी त्या रूपाध्यक्षपदी मयुरी मंगावते यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा बेनाडी येथील भाग्यलक्ष्मी सौहार्द संस्थेतर्फे अध्यक्ष शंकर जनवाडे, रेखा जनवाडे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी संचालक संजय तावदारे यांनी स्वागत केले. अध्यक्ष शंकर जनवाडे यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला.
यावेळी अध्यक्ष मृणालिनी पाटील, संचालक रवींद्र जनावडे, राजेंद्र चौगुले, मधुकर जाधव, संजय पार्वते, राजू क्षीरसागर, सदानंद माळी निर्मला जनवाडे, सुरेश वराळे, भीमा मस्ताने, सेक्रेटरी विजय वाडकर यांच्यासह संचालक सभासद उपस्थित होते. ज्योतीराम जनवाडे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *