Monday , September 21 2026
Breaking News

जिल्हास्तरीय ऑफिशियल कराटे निवड चाचणीसाठी कराटेपटूंना आवाहन

Spread the love

 

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा कराटे क्रीडा संघटना यांच्यावतीने दिनांक 26 व 27 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हास्तरीय ऑफिशियल कराटे निवड चाचणी घेतली जाणार आहे.

गोवावेस, जक्कीनहोंडाजवळील संत तुकाराम सांस्कृतिक भवन येथे कराटेपटूंची निवड चाचणी घेतली जाणार आहे.
14 वर्षांखालील व 15 वर्षांवरील अशा वयोगटात याकरिता स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर दिनांक 5 सप्टेंबर 2013 रोजी कर्नाटक राज्य कराटे संघटनेच्यावतीने राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेकरिता बेंगळूर येथे निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
बेळगाव जिल्हास्तरीय निवड चाचणीसाठी बेळगाव जिल्ह्यातील कराटे प्रशिक्षण संघटनांनी बेळगाव जिल्हा कराटे संघटनेकडे नोंदणी करावयाची आहे, अशी माहिती जिल्हा कराटे क्रीडा संघटनेचे सचिव जितेंद्र काकतीकर यांनी दिली असून अधिक माहितीसाठी दीपक काकतीकर मोबाईल क्रमांक 9008697436 अथवा 9845474643, 9945121398 यावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *