बेळगाव : अतिवृष्टीमुळे धबधब्याजवळ जाण्यास पर्यटकांना निर्बंध घालण्यात आले असताना अधिकाऱ्यांनीच ओली पार्टी केल्याची घटना जांबोटीजवळच्या बटावडे धबधब्यावर घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, हेस्कॉमचे कांही अधिकारी आणि डॉक्टरांच्या एका गटाने जांबोटीजवळील बटावडे धबधब्याजवळ तंबू ठोकून मोठ्या प्रमाणात पार्टी करून मौजमजा केल्याची घटना सर्वत्र चर्चेत आहे. पावसामुळे धबधबा आणि …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह 19 नेत्यांना हायकमांडकडून बोलाओ
बंगळुरू : काँग्रेस आमदारांमधील असंतोषाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने हस्तक्षेप केला आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांना दिल्लीत उपस्थित राहण्याचे आदेश जारी केला आहे. हायकमांडने काँग्रेसच्या १९ नेत्यांना दिल्लीत येण्याची सूचना केली असून या पार्श्वभूमीवर सतीश जारकीहोळी, रामलिंगरेड्डी यांच्यासह अनेक मंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, …
Read More »विस्तारित कार्यकारिणीमध्ये तरुणांना समाविष्ट करून संघटना बळकट करण्याचा निर्धार!
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शिवस्मारक येथे दिनांक 30 जुलै रोजी म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सद्यस्थितीत महाराष्ट्र एकीकरण समिती समोर अनेक आव्हाने आहेत. संघटना बळकट करण्यासाठी नवनिर्वाचित अध्यक्ष व समिती पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागणे …
Read More »डी. के. शिवकुमार यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
नवी दिल्ली : उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती मिळवल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना सर्वोच्च न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयने डी. के. शिवकुमार यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली आणि म्हटले की, ते उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे सीबीआय मागे हटली आहे. उच्च न्यायालयाने …
Read More »राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; हवामान खात्याचा अंदाज
बंगळुरू : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी असून हवामान सूर्यप्रकाशित आहे. दरम्यान, 3 ऑगस्टनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 3 ऑगस्टनंतर किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कन्नड, उडुपी, उत्तर कन्नड जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बेळगाव, बिदर, गदग, हावेरी, धारवाड, …
Read More »नदीकाठावरील पीके अद्याप पाण्याखाली
कोगनोळी परिसरातील चित्र : पावसाची उघडीप कोगनोळी : कोगनोळी सह परिसरात गेल्या दहा-बारा दिवसापासून संततधार पाऊस सुरु होता. त्यामुळे जनजीवन विस्कळित होऊन बसले होते. कधी एकदा पाऊस उघडतो याची चिंता शेतकरी वर्गासह नागरिकांना लागून राहिली होती. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. धुवाधार पावसामुळे दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे दलितांचे खरे रक्षक : राजेंद्र पवार- वडर यांची माहिती
निपाणी (वार्ता) : दलित समुदायासाठी आर्थिक व सामाजिक विकासासाठी राज्यातील काँग्रेस सरकार कार्यतत्पर आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे तर दिन दलितांचे नेहमीच विचार करीत असतात. त्यांच्या विकाकासाठी कार्यरत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून दलितांच्यासाठी असलेल्या निधीवर इतर लोकांनी डल्ला मारत होते. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नियमात दुरुस्ती करून दलितांचे निधी दलितांच्यासाठीच …
Read More »खानापूरात समुत्कर्श संस्थेकडून ५ ऑगस्ट रोजी आयएएस अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शन शिबीर
खानापूर : खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातून भारतीय प्रशासकीय सेवेत आयएएस अधिकारी म्हणून होतकरू विद्यार्थ्यांची निवड व्हावी व देशाची व जनसामन्यांची प्रामाणिक सेवा त्यांच्या हस्ते व्हावी यासाठी समुत्कर्श संस्था कर्नाटक यांच्यावतीने खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना आयएएस अभ्यासक्रमाची ओळख व्हावी व पुढे त्यांच्यासाठी कार्यशाळा शिबीर आयोजित करण्याच्या उद्देशाने शनिवारी दि. ५ ऑगस्ट …
Read More »गर्लगुंजी पीकेपीएस संघाच्या चेअरमनपदी राजाराम मारूती सिध्दाणी, तर व्हा. चेअरमनपदी सौ. शामल पाटील
खानापूर : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी (पीकेपीएस) संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच चुरशीने पार पडली. या निवडणुकीमध्ये श्री माऊली देवी विकास पॅनलला घवघवीत यश मिळाले. नंतर शनिवारी दि. २९ रोजी झालेल्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीमध्ये राजाराम मारुती सिध्दाणी यांची चेअरमनपदी निवड झाली व सौ. शामल …
Read More »खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा विद्युतभारीत तारेच्या स्पर्शाने मृत्यू
खानापूर : मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा विद्युतभारीत तारेच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी दुपारी तीनच्या सुमारास खानापूर तालुक्यातील मेंढेगाळी मलवाड दरम्यान कुलमवाडा नजिक घडली आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव मारुती गोविंदप्पा वडर असे असून तो हल्ल्याळ तालुक्यातील अंत्रोळी गावचा रहिवासी आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta