Monday , September 21 2026
Breaking News

पर्यटनास निर्बंध असताना अधिकाऱ्यांनीच केली धबधब्याजवळ ओली पार्टी!

Spread the love

 

बेळगाव : अतिवृष्टीमुळे धबधब्याजवळ जाण्यास पर्यटकांना निर्बंध घालण्यात आले असताना अधिकाऱ्यांनीच ओली पार्टी केल्याची घटना जांबोटीजवळच्या बटावडे धबधब्यावर घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, हेस्कॉमचे कांही अधिकारी आणि डॉक्टरांच्या एका गटाने जांबोटीजवळील बटावडे धबधब्याजवळ तंबू ठोकून मोठ्या प्रमाणात पार्टी करून मौजमजा केल्याची घटना सर्वत्र चर्चेत आहे. पावसामुळे धबधबा आणि नद्या दुथडी भरून वाहत असून, खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना धबधब्याकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला असतानाही अधिकारी, डॉक्टरांच्या एका गटाने पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना चकवून मौजमजा केली. सदर बातमी प्रसारमाध्यमांमध्ये पसरताच सतर्क झालेल्या पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि गॅस शेगडी, स्वयंपाकाची भांडी आणि इतर साहित्य जप्त केले. तसेच, प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवाना प्रवेश केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध जांबोटी झोन ​​वन कार्यालयात वन्यजीव अधिनियम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *