Sunday , July 26 2026
Breaking News

धबधब्याजवळ अधिकाऱ्यांची ओली पार्टी : उर्वरित चार कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Spread the love

 

बेळगाव : बटावडे धबधब्याजवळील जंगल परिसरात दारूबंदीचे उल्लंघन करून मौजमजा केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध यापूर्वीच तक्रार दाखल करण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांनी अन्य चौघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
पर्यटनास बंदी असतानाही बटावडे धबधब्याजवळील वनपरिक्षेत्रात अधिकारी व डॉक्टरांच्या गटाने ओली पार्टी केल्याप्रकरणी जांबोटी वनपरिक्षेत्रात चार जणांविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी उपस्थित असलेले हेस्कॉमच्या उर्वरित चार कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा, असे आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी उप वनसंरक्षकांना दिले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *