Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

लखनापूर-पडलीहाळ ग्रुप ग्राम पंचायत अध्यक्षपदी काँग्रेसच्या बेबीजान शिरकोळी

  उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा सूर्यवंशी; दोन्ही निवडी बिनविरोध निपाणी (वार्ता) : लखनापूर-पडलीहाळ ग्रुप ग्रामपंचायत अध्यक्षपदी काँग्रेसच्या बेबीजान शिरकोळी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा सूर्यवंशी निवड झाली. अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज दाखल झाले त्यामुळे या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी जी.डी. मंकाळे यांनी केली. यावेळी …

Read More »

कुर्ली-भाटनांगनूर वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर

  कोगनोळी : कोकण पट्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे व कुर्ली परिसरात गेल्या आठ-दहा दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. या पावसामुळे नदीकाठावरील पीके पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर आणखी काही दिवस असाच राहिल्यास महापूर येण्याची भीती निर्माण झाली आहे. …

Read More »

खानापूर तालुक्यातील प्राथमिक-उच्च माध्यमिक शाळा आणि पीयू महाविद्यालयांना आज सुट्टी!

    बेळगाव : खानापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे मंगळवारी (25 जुलै) खानापूर तालुक्यातील प्राथमिक-उच्च माध्यमिक शाळा आणि पीयू महाविद्यालयांना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. खानापुरा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा आणि पीयू महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Read More »

खानापूर तालुक्यात पावसाचे थैमान; घराची पडझड, लाखोचे नुकसान

  खानापूर : खानापूर तालुका हा अति पावसाचा तालुका अशी ओळख आहे. गेल्या आठवड्यापासून खानापूर शहरासह तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने नदी, नाल्यासह, तलावाना पूर आला आहे. शिवारात पाणीच पाणी झाल्याने सर्वच पीके पाण्याखाली गेली आहेत. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागातील खेड्यात घरांना गळती लागुन घराच्या भिंती …

Read More »

गर्लगुंजी ग्रा. पं. अध्यक्षपदी सौ. ललिता कोलकार, उपाध्यक्षपदी सौ. रेखा कुंभार यांची निवड

  खानापूर : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील ३० महिन्याच्या कालावधीसाठी ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड सोमवारी दि. २४ रोजी ग्राम पंचायतीच्या सभागृहात पार पडली. यावेळी गर्लगुंजी ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण एस सी महिला गटासाठी आले होते. तर उपाध्यक्ष पदाचे आरक्षण सामान्य महिला गटासाठी आले …

Read More »

निपाणी तालुक्यातील ३५ हजारावर लोकांना ‘धनभाग्य’ ची प्रतीक्षा!

  आधार लिंक, केवायसीच्या समस्या ; शहर ग्रामीण भागात गर्दी निपाणी (वार्ता) : राज्य सरकारने अन्नभाग्य योजनेअंतर्गत पाच किलोवरील धान्याची रक्कम थेट संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे रेशनकार्डधारकांच्या खात्यावर सदर पैसे जमा होत आहेत. निपाणी तालुक्यात एकूण 67 हजार 386 बीपीएल तर 1580 अंत्योदय रेशनकार्डधारकांना या योजनेचा …

Read More »

मेरडा- करजगी रस्त्यावरील तलावाचा बांध ग्रा. पं. अध्यक्षांच्या दक्षतेने बचावला!

  खानापूर : खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मलप्रभा नदीसह नाले, तलाव दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याच्या प्रवाहामुळे बंद झाले आहेत. तालुक्यातील मुसळधार पावसामुळे हालगा ग्राम पंचायत हद्दीतील मेरडा -करजगी रस्त्यावरील मोठा तलाव काठोकाठ भरून ओसंडत असताना तलावाचा मोठा बांध फुटला जात असल्याची घटना हलगा ग्राम …

Read More »

गांजा विक्री प्रकरणी बोरगावमध्ये दोघांना अटक

  निपाणी (वार्ता) : बेकायदेशीररित्या गांजा विकत असताना सदलगा पोलिसांनी धाड टाकून बोरगाव येथील दोघा युवकांना अटक केली आहे. पद्माकर अभयकुमार उपाध्ये (वय ३५) व अभिषेक बाबासाहेब माळी (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या युवकांचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, पद्माकर उपाध्ये व अभिषेक माळी हे अनेक दिवसापासून …

Read More »

मलप्रभा नदीपात्रात पडलेला बैल 10 कि.मी. अंतरावर सापडला!

  खानापूर : पावसाने सध्या सर्वत्र थैमान मांडले आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहेत. शेतीच्या कामाला देखील वेग आलेला आहे. मलप्रभा नदी काठावरील शेतात चरण्यासाठी सोडलेला बैल पाय घसरून नदीपात्रात पडला. मात्र या बैलाने मोठ्या धाडसाने दुथडी भरून वाहणाऱ्या नदीपात्रातून जवळपास दहा किलोमीटर अंतर पोहत जाऊन स्वतःचा जीव वाचण्याची घटना …

Read More »

मानसिक ताणतणाव विसरून काम करावे : श्रीधर कोकणूर

  ‘महात्मा बसवेश्वर’तर्फे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर निपाणी (वार्ता) : इच्छाशक्ती असल्यास कोणत्याही क्षेत्रात यश हमखास मिळते. तर प्रत्येक समाजसेवक मात करत राहिल्यास जीवन सुखी बनते. समूहामध्ये काम करत असताना यश हे एकट्याचे नसते तर सर्वांचे असते, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. कर्मचारी वर्गाने संस्थेच्या प्रगतीत हातभार लावणे ही त्यांची जबाबदारी आहे. …

Read More »