खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीला आजपर्यंत अनेक चिफ ऑफिसर होऊन गेलेत. मात्र आतापर्यंतच्या कोणत्याही चिफ ऑफिसरनी चारचाकी वाहनाची मागणी केली नाही. मात्र नुकताच आलेल्या आर. के. वठार या चिफ ऑफिसरनी आल्याआल्या चारचाकी नविन वाहनाची मागणी केली. जो पर्यंत नविन चारचाकी वाहनाची व्यवस्था होत नाही. तोपर्यंत रोज भाड्याने चारचाकी वाहनाची …
Read More »मोहनलाल दोशी विद्यालयात एकादशी निमित्त दिंडी, पालखी सोहळा
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त गुरुवारी (ता.२९) दिंडी व पालखी सोहळा झाला. मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले यांनी पालखीचे पूजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत डोईवर तुळस व कलश घेऊन लेझीमच्या ठेक्यावर वीणा, टाळ व मृदंगासोबत विठूनामाचा गजर करत दिंडीने बसवाननगर मधून …
Read More »गर्लगुंजी गावचे सुपुत्र शामराव देसाई यांची पीएसआय पदी बढती
खानापूर : मुळचे गर्लगुंजी (ता. खानापूर) गावचे सुपूत्र व सध्या कोल्हापूर येथील रहिवाशी शामराव व्यंकट देसाई हे गेली अनेक वर्षे महाराष्ट्र पोलीस खात्यात सेवा बजावत असून त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा बजावली आहे. चार वर्षांपूर्वीच त्यांना शिपाई पदावरून हवालदार पदी बढती मिळाली होती. नुकताच त्यांना पुनः बढती मिळाली …
Read More »खानापूर तालुक्यात खरी हंगामातील विमा भरण्यासाठी ३१ जूलै
खानापूर : खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाच्या खरीप हंगामातील रयत सुरक्षा प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत कृषी खात्याने विमा योजना जारी केली आहे. तेव्हा खरीप हंगामातील विमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. तेव्हा तालुक्यातील शेतकरी वर्गाने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खानापूर तालुका कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण यांनी …
Read More »सेवानिवृत्ती निमित्त प्रा. नानासाहेब जामदार यांचा उद्या सत्कार
निपाणी(वार्ता) येथील अर्जुननगर(ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक नानासाहेब जामदार हे ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर शुक्रवारी (ता.३०) सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रा. नानासाहेब जामदार यांनी आतापर्यंत कारवार, कणकवली, निपाणी अशा विविध ठिकाणी एकूण ३५ वर्षे ज्ञानदानाचे काम केले आहे. येथील …
Read More »निपाणीच्या डाॅ. ऋचा चिकोडे वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील डी.एन.बी पदवीने सन्मानीत
निपाणी (वार्ता) : भारत सरकारच्या आरोग्य व कुंटूब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त शैक्षणिक संस्था आयुर्विज्ञान राष्ट्रीय परीक्षा बोर्ड नवी दिल्ली यांनी 2022-23 या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील पदव्युत्तर समकक्ष डीएनबी या पदवीसाठी नवी दिल्ली येथे परीक्षा घेतली होती. या परीक्षेत निपाणीची सुकन्या डाॅ. ऋचा मधुसूदन चिकोडे ही …
Read More »खानापूर तालुक्यात पावसाची दडी; शेतकरी वर्गात चिंता
खानापूर : खानापूर तालुक्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टी होते. त्यामुळे नदी नाल्यांना पाणी मुबलक पाणी मिळते. मात्र यावर्षी कुठेच पाऊस न झाल्यामुळे खानापूर तालुक्यातील नदी, नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे सर्वच पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले …
Read More »‘अंकुरम’मध्ये रंगला माऊलीचा रिंगण सोहळा!
स्कूलमध्ये भरली विठू नामाची शाळा; आषाढी एकादशी निमित्त आयोजन निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नेहमीच सांस्कृतिक वारसा जपत विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक व पारंपारिक शिक्षणावरही भर दिला जात आहे. त्यानुसार गुरुवारी (ता.२९) होणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.२८) शाळेमध्ये प्राचार्या चेतना चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी …
Read More »“ऑपरेशन मदत” ग्रुपच्या कार्यकर्त्यांची झाड-अंकले गावातील सरकारी प्राथमिक शाळेला सदिच्छा भेट
खानापूर : ग्रामीण शिक्षण अभियानअंतर्गत खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील सरकारी शाळेंना भेट देऊन तेथील परिस्थिती पाहून गरज भासल्यास शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ‘ऑपरेशन मदत’ ग्रूपची मदत होत आहे. आज कार्यकर्त्यांनी गणेबैल शेजारील झाड-अंकले गावच्या सरकारी प्राथमिक शाळेला भेट दिली. विद्यार्थीनींनी गुलाब पुष्प देऊन व गाणी गावून उपस्थितांचे स्वागत केले. शाळेच्या …
Read More »तांदळा ऐवजी पैसे देण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय
बेंगळुरू: अन्नभाग्य योजनेअंतर्गत 5 किलो तांदळाच्या बदल्यात पैसे देण्याचा निर्णय कर्नाटक राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना अन्नमंत्री केएच मुनिअप्पा म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकांना तांदळाऐवजी पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने अतिरिक्त तांदूळ देण्यास नकार दिल्याने तांदळाचा तुटवडा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta