Monday , September 21 2026
Breaking News

तांदळा ऐवजी पैसे देण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय

Spread the love

 

बेंगळुरू: अन्नभाग्य योजनेअंतर्गत 5 किलो तांदळाच्या बदल्यात पैसे देण्याचा निर्णय कर्नाटक राज्य सरकारने घेतला आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना अन्नमंत्री केएच मुनिअप्पा म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकांना तांदळाऐवजी पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारने अतिरिक्त तांदूळ देण्यास नकार दिल्याने तांदळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना 5 किलो तांदळाऐवजी पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते म्हणाले की, जुलैपासूनच 34 रुपये प्रति किलो दराने पैसे खात्यात जमा केले जातील.

म्हणजेच प्रत्येक रेशनधारकाच्या खात्यात 5 किलो तांदळाऐवजी 170 रुपये दिले जातील. तांदूळ मिळेपर्यंत आम्ही पैसे देणार असून तांदूळ मिळाल्यानंतर 10 किलो तांदूळ वाटण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *