Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

रयत संघटनेच्या राजू पोवार यांना निजदची उमेदवारी जाहीर

निपाणी (वार्ता):) : चिकोडी जिल्हा रयत संघटना अध्यक्ष राजू पोवार यांना निधर्मी जनता दलाचे निपाणी मतदारसंघांसाठी अधिकृत उमेदवारची घोषणा करण्यात आली. निधर्मी जनता दलाचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष कल्लाप्पाण्णा मगेन्नावर यांच्या निवासस्थानी ही घोषणा करण्यात आली. याप्रसंगी निपाणी निधर्मी जनता दल अध्यक्ष प्रसन्नकुमार गुजर, (भैया) सुनिता लाटकर,  बबन जामदार, प्रा. हालापा …

Read More »

गौरी लंकेश प्रकरणातील मुख्य अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावर गोळीबार!

  हल्ल्यामागे ‘पीएफआय’ की नक्षलवादी याचा शोध घ्या ! – हिंदु जनजागृती समिती कर्नाटकतील गौरी लंकेश हत्या प्रकरणात गोवण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने खटला लढवणारे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावर काल रात्री अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. अधिवक्ता कृष्णमूर्ती हे विश्व हिंदु परिषदेची बैठक झाल्यावर त्यांच्या चारचाकी वाहनातून परत येतांना कर्नाटकातील चेट्टळ्ळी ते …

Read More »

लक्ष्मण सवदी यांचा कॉंग्रेसमध्ये रितसर प्रवेश

काँग्रेस नेत्यांशी चर्चा, शशीकांत नाईकही काँग्रेसमध्ये दाखल बंगळूर : माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी शुक्रवारी भगवा पक्ष सोडून काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश केला. त्यांच्या सोबत माजी मंत्री शशीकांत नाईक, भाजप नेते अक्कप्पा आदीनीही भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. येथील केपीसीसी कार्यालयात आज सायंकाळी झालेल्या एका कार्यक्रमात प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीप …

Read More »

कोगनोळी टोलवर ४ लाख २५ हजार जप्त; पोलिसांची कारवाई

  कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर ४ लाख २५ हजार रुपये सापडल्याची घटना गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी तपासणी नाक्यावर पुण्याहून बेंगलोरकडे जात असणाऱ्या व्हीआरएस …

Read More »

खानापूर मतदारसंघात भाजप कार्यालयासंदर्भात काँग्रेस उमेदवाराची तक्रार

  खानापूर (प्रतिनिधी) : सध्या कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे पक्षा पक्षात एकमेकावर आरोप प्रत्यारोप बरोबरच विरोध कसा करता येईल याची संधी पक्षाचे नेते पहात असतात. असाच प्रकार खानापूर मतदार संघातून पाहायला मिळाला. शुक्रवारी दि. १४ एप्रिल रोजी काँग्रेसच्या उमेदवाराकडून निवडणूक अधिकारी वर्गाकडे तहसील कार्यालयापासून अवघ्या १०० …

Read More »

भिवशी नांगणूर येथे 132 वी बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

  निपाणी : निपाणी व निपाणी ग्रामीण भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. भिवशी नांगणूर ता.निपाणी येथे आं, भि, रा, युवक मंडळ यांच्या वतीने 132 वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सकाळी 8 वाजता माणगाव येथून क्रांतीज्योतीचे आगमन झाले. व तसेच 9 वाजता …

Read More »

माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी काँग्रेसमध्ये दाखल

  कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केली मोठी घोषणा बेंगळूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीसाठी अथणी मतदारसंघातून भाजपने पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या माजी उपमुख्यमंत्री तथा विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनीही घोषणा केली. भाजप …

Read More »

खानापूर मतदारसंघात बंडखोरीचे सावट!

  खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्याच्या सन २०२३ सालच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि खानापूर मतदारसंघातून सर्वच पक्षातील उमेदवार बंडखोरीचे अस्त्र उभारण्याचे लक्षणं यंदाच्या निवडणुकीत दिसुन येत आहे. तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे सर्व प्रथम नाव जाहीर झाले. तसे अंजली निंबाळकर यांनी प्रचाराला प्रारंभ केला. मात्र काँग्रेस युवा नेते इरफान …

Read More »

भाजपची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; आणखी सात आमदारांना डावलले

  बंगळूर : मंगळवारी १८९ उमेदवारांच्या पहिल्या यादीनंतर बंडखोरी होऊनही भाजपने बुधवारी रात्री २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. पहिल्या यादीत नऊ विद्यमान आमदारांना तिकीट नाकारणाऱ्या पक्षाने दुसरी यादी तयार करताना विद्यमान आमदार नेहरू ओलेकार, एम. पी. कुमारस्वामी यांच्यासह आणखी सात आमदारांना डावलण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. …

Read More »

माजी आमदार प्रा. जोशी यांच्या भूमिकेमुळे अनेक कार्यकर्ते गटापासून दूर

  विनोद साळुंखे : लवकरच घेणार बैठक निपाणी (वार्ता) : माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांच्या नेतृत्वत गेली ३० वर्षे आम्ही कार्य करत आहोत. पण यंदा प्रा. सुभाष जोशी यांनी सर्व कार्यकर्त्यांना गृहीत धरून आपली भूमिका जाहीर केली आहे. ही भूमिका आम्हाला मान्य नसल्याने आम्ही प्रा. जोशी यांच्या गटातून बाहेर …

Read More »