Sunday , July 26 2026
Breaking News

कोगनोळी टोलवर ४ लाख २५ हजार जप्त; पोलिसांची कारवाई

Spread the love

 

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर ४ लाख २५ हजार रुपये सापडल्याची घटना गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी तपासणी नाक्यावर पुण्याहून बेंगलोरकडे जात असणाऱ्या व्हीआरएस बसची तपासणी करण्यात आली. यावेळी बसमधील अनंत वाडूकर यांच्याकडे ४ लाख २५ हजार रुपये असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेऊन पंचनामा केला.
निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, उपनिरीक्षक कृष्णा नाईक, उपनिरीक्षक रेवांना गुरीकार, संजय बारवाडकर, महेश सांगावे, शिवप्रसाद कडकनावर आदी कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Spread the love  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *