खतासह आयशर वाहन खाक : आग विझवण्यात अपयश निपाणी (वार्ता) : बोरगाव -इचलकरंजी रस्त्यावर असलेल्या खंडेलवाल बायो केमिकल खत कारखान्यास शनिवारी पहाटे आग लागून पाच कोटीचे नुकसान झाले आहे. विविध भागातून अग्निशामक दलाची वाहने येऊन सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. पहाटेच्या वेळी कारखान्यात कुणी नसल्याने सुदैवाने प्राणहानी झालेली नाही. …
Read More »खानापूर समितीची विस्तृत कार्यकारिणी लवकरच!
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक 26 जानेवारी रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते. व्यासपीठावर माजी आमदार दिगंबर पाटील, ज्येष्ठ सीमासत्याग्रही पुंडलीकमामा चव्हाण, कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे, सचिव सीताराम बेडरे, मारुती परमेकर, विलासराव बेळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. तालुका समितीची …
Read More »खानापूर येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्याकडून आंदोलनाचा इशारा
खानापूर : खानापूरमधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची मागणी करण्यात आली आहे. एक कोटी खर्चून विद्यार्थी वसतिगृह बांधण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. संपूर्ण इमारत नादुरुस्त झाली आहे. इमारती बाजूने असलेली भिंत देखील कोसळलेली आहे. त्यामुळे वसतिगृह म्हणजे दारुड्यांचे ठिकाण झाले आहे. तरीही इमारत परत एकदा …
Read More »संविधानमुळे राजा मतपेटीतून जन्माला येऊ लागला
प्राध्यापक प्रकाश नाईक : कोगनोळीत व्याख्यान कोगनोळी : स्वतंत्र पूर्व काळात राजा फक्त राणीच्या पोटाला जन्माला येत होता. 26 जानेवारी 1950 पासून राजा मतपेटीतून जन्माला येऊ लागला, असे प्रतिपादन लेखक, विचारवंत प्राध्यापक प्रकाश नाईक यांनी केले. कोगनोळी तालुका निपाणी येथील हालसिद्धनाथ नगर येथे 74 व्या प्रजासत्ताक दिनी आयोजित व्याख्यानात …
Read More »बनावट मार्क्सकार्ड रॅकेटचा पर्दाफाश; बंगळुरमध्ये पाच संस्थांवर छापेमारी
बंगळूर : केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) बनावट मार्क्स कार्ड रॅकेट चालवणाऱ्या पाच संस्थांवर छापे टाकले आणि भारतातील नामांकित विद्यापीठांच्या सहा हजार बनावट गुणपत्रिका जप्त केल्या. गेल्या काही दिवसांत सीसीबीकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. मार्क्स कार्ड रॅकेटच्या पोलिस तपासात बंगळुरच्या विविध भागांतील पाच संस्था या रॅकेटमध्ये सामील असल्याचे समजते. पोलिसांनी …
Read More »अमलझरीची तीन वर्षानंतर सब रजिस्टर ऑफिसला नोंद
आपच्या पाठपुराव्याला यश : ग्रामस्थांमधून समाधान निपाणी (वार्ता) : अमलझरी गावाची निपाणी सब रजिस्टर कार्यालयामध्ये नोंद व्हावी, यासाठी ग्रामस्थांकडून तीन वर्षांपासून लढा चालू होता. तरीही कोणत्याही राजकीय पक्षाकडून अथवा पक्ष प्रमुखाकडून या विषयी निवेदन देऊन सुध्दा दखल घेतली गेली नाही. अमलझरी ग्रामस्थ त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय सहन करत विवंचनेत पडले …
Read More »भाजपा हा व्यापाऱ्यांचा पक्ष!
माजी आमदार काकासाहेब पाटील : निपाणीत काँग्रेसचा युवा मेळावा निपाणी (वार्ता) : काँग्रेस सत्तेमध्ये असताना निपाणी शहर आणि ग्रामीण भागात शाश्वत विकासाची कामे केली आहेत. मात्र भाजपचे लोकप्रतिनिधी मूलभूत सुविधा पुरवण्याच्या नावाखाली नागरिकासह तरुणांना बोलवण्याचे काम करीत आहेत, असा घनाघाती आरोप माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केला. येथील मराठा मंडळ …
Read More »घोटगाळीत श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा कळसारोहण
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील घोटगाळी येथे जवळपास 15 ते 18 लाख रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा कळसारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना गुरुवारी पार पडली. यावेळी मंदिराचा कळसारोहण भारतीय जनता पार्टीचे नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विठ्ठल हलगेकर यांनी …
Read More »खानापूरात एलआयसी “एजंट डे” उत्साहात साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील शुभम गार्डन हॉलमध्ये बेळगाव एलआयसी ऑफ इंडिया ब्रांच वन व सॅटलाईट ऑफिस खानापूर यांच्यावतीने एलआयसी “एजंट डे” उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सभेचे अध्यक्ष म्हणून एलआयसी एजंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून चंदगड येथील एम डी आर टी एजंट …
Read More »हणबरवाडी ग्रामस्थांचा प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा
पाटील मळ्याजवळ पुलाची मागणी : मागणी न मान्य झाल्यास रस्ता काम बंद कोगनोळी : राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे नागरिकांना येणे जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. व महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाडी-वस्तीवरील विद्यार्थी व नागरिकांना महामार्गावरून गावाकडे व गावातून पुन्हा महामार्गावरून निपाणी, कोल्हापूरकडे जाण्यासाठी मोठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta