खानापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 28 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता एम. के. हुबळी येथे विजय संकल्प यात्रेसाठी उपस्थित राहणार आहेत. खानापूर, कित्तूर, बैलहोंगल आदी भागातून बहुसंख्य नागरिकांनी अमित शहा यांच्या जाहीर सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत …
Read More »खानापूरात संगोळी रायन्नाच्या बलिदान दिनानिमित्त रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
खानापूर : खानापूर शहरात सालाबादप्रमाणे यंदाही खानापूर हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिवीर संगोळी रायन्नाच्या बलिदान दिनानिमित्त गुरूवारी दि. २६ जानेवारी रोजी आयोजित भव्य बाईक रॅलीला युवकाचा भव्य प्रतिसाद लाभला. गुरूवारी सकाळी रॅलीचे सुरूवात खानापूर शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून करण्यात आली. प्रारंभी …
Read More »कुन्नूरमध्ये रविवारपासून ‘अरिहंत चषक’ शुटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा
उत्तम पाटील : आंतरराष्ट्रीय १६ संघ सहभागी निपाणी (वार्ता): कुन्नूर (ता. निपाणी) येथील श्री. दत्त शूटिंग व्हॉलीबॉल क्लबतर्फे कुन्नूर येथे अरिहंत चषक शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवारी (ता.२९) दुपारी २ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील १६ संघ सहभागी झाले आहेत. सोमवारी (ता.३०) रात्री अंतिम सामना …
Read More »खानापूर मराठा मंडळ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी संतोषी गुरव पथसंचलनात
खानापूर : मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथील 25 कर्नाटका बटालियन संचलित एनसीसी विभागाची कॅडेट कुमारी संतोषी शिवाजी गुरव ही विद्यार्थिनी प्रजासत्ताक दिनी चालणाऱ्या पथसंचलनात सहभागी झाली आहे. कुमारी संतोष हिने याआधी राज्य पातळीवर परिश्रम घेत असताना बेळगाव, धारवाड, बल्लारी, मंगलोर, बेंगलोर इत्यादी ठिकाणी जवळजवळ सहा …
Read More »मताला सहा हजार रुपयाचे अमिष; आमदार, मुख्यमंत्री, भाजप राष्ट्रीय अध्यक्षाविरुध्द कॉंग्रेसची तक्रार
बंगळूर, ता. २५: राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने मतदारांना आमिष दाखविल्याबद्दल काँग्रेस पक्षाने आमदार रमेश जारकीहोळी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी तक्रार पत्रावर स्वाक्षरी केली …
Read More »प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिलेबी, हार, गजराचे स्टॉल
२०० रुपये किलो जिलेबी :१०० रुपयापुढे हार निपाणी (वार्ता) : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर निपाणी शहरात जिलेबी चे स्टॉल, फुलांचे हार आणि गजर यांच्या स्टॉलवर खरेदीसाठी बुधवारी (ता.२५) सायंकाळी गर्दी झाली होती. यावर्षी जिलेबी प्रति किलो २०० रुपये, फुलांचे हार १०० रुपयावर तर गजरे २५ रुपयाच्या पुढे विक्री केली जात होती. …
Read More »गॅस सिलेंडर स्फोटातील आपद्ग्रस्तांना डॉ. सोनाली सरनोबत यांची मदत
खानापूर : खानापूर शहरालगत असलेल्या शिवाजीनगर येथील व्ही. एन. पाटील निवृत्त जवान यांच्या घरी घरगुती गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे स्फोट झाला व त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाटील कुटुंबियांची चौकशी …
Read More »काँग्रेस सत्तेवर आल्यास गोमूत्र आणि डेटॉलने विधानसभेची स्वच्छता करू : शिवकुमार
बेंगळुरू : कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार हे सातत्याने आपल्या विधानमुळे चर्चेत असतात. यावेळी, त्यांनी भाजपने विधानसभा अपवित्र केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच आपला पक्ष सत्तेवर आल्यास गोमूत्र आणि डेटॉलने विधानसभेची स्वच्छता करू, असेही म्हटले आहे. यामुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण तापले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, भाजपवर निशाणा …
Read More »पुरुष विभागात पुणे, महिला विभागात केरळ संघ अरिहंत चषकाचा मानकरी
पुरुष 40 तर महिलांचे 10 संघ सहभागी : प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : बालवीर स्पोर्ट्स क्लब आयोजित अरिहंत उद्योग समूह व उत्तम पाटील युवाशक्ती यांच्यातर्फे राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धेतील पुरुष गटात अंतिम सामन्यात पुणे संघाने प्रथम क्रमांक मिळवून अरिहंत चषक, सुवर्णपदक आणि रोख 25 हजाराचे बक्षीस मिळविले. तर …
Read More »खानापूर तालुक्यातील गोदोळी येथे जंगली हत्तींच्या कळपाचे दर्शन
खानापूर : बुधवारी सकाळी खानापूर तालुक्यातील गोदोळी येथे जंगली हत्तींच्या कळपाचे आगमन झाले असून त्यांनी शेतातील पिकाची मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे. सकाळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना जंगली हत्तींच्या कळपाचे दर्शन घडले. लगेच शेतकऱ्यांनी अन्य शेतकऱ्यांना आणि वन खात्याला हत्तीचा कळप आल्याची माहिती दिली. या कळपात चार हत्ती असून त्यामध्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta