Tuesday , April 21 2026
Breaking News

गॅस सिलेंडर स्फोटातील आपद्ग्रस्तांना डॉ. सोनाली सरनोबत यांची मदत

Spread the love

 

खानापूर : खानापूर शहरालगत असलेल्या शिवाजीनगर येथील व्ही. एन. पाटील निवृत्त जवान यांच्या घरी घरगुती गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे स्फोट झाला व त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
घटनेची माहिती भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाटील कुटुंबियांची चौकशी केली व त्यांना धीर दिला व 5000 रुपयांची मदत देखील डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली व पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

About Belgaum Varta

Check Also

म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या कु. सबीना लुईस लोबो हिचा गौरव

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातच नव्हे तर बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण कर्नाटक राज्यात आपल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *