खानापूर : महिलांनी त्यांचे हक्क व जबाबदाऱ्यांप्रति जागरूक असले पाहिजे. एक स्त्रीच चांगला समाज घडवू शकते. स्त्री ही अबला नसून ती सबला आहे. खानापूर तालुक्यात 54 टक्के महिला मतदार आहेत. समस्त महिला आपल्या हक्क व जबाबदरीप्रति जागरूक असतील तर महिला सामाजिक व राजकीय बदल घडवू शकतात, असे मत भाजपा …
Read More »नंदगड येथे मालमत्तेच्या वादातून एकाची हत्या
खानापूर : मालमत्तेच्या वादातून भाऊबंदांनी एकाची हत्या केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी खानापूर तालुक्यातील नंदगड परिसरात घडली. यल्लाप्पा संताराम गुरव (वय 33 वर्षे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत येणाऱ्या बाळी कोडल गावच्या वेशीवरील एका घरात सदर खुनाचा प्रकार घडला आहे. मालमत्तेच्या वादातून …
Read More »नियती फौंडेशच्या वतीने इटगी येथे हळदीकुंकू समारंभ
खानापूर : महिलांना रोजच्या व्यावहारिक जीवनातून थोडा निवांतपणा मिळावा, विचारांची देवाणघेवाण करता यावी यासाठी हळदीकुंकूच्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतात. त्यासाठी हळदीकुंकूसारखे कार्यक्रम करणे गरजेचे आहे, असे भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या. नियती फौंडेशच्या वतीने मकरसंक्रांतीचे औचित्य साधून इटगी येथे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नियती फौंडेशनच्या …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन!
खानापूर : वैयक्तिक हेवेदावे विसरून समितीला बळकटी देणे व आमिषाना बळी पडून राष्ट्रीय पक्षाकडे गेलेल्या तरुणाईला समितीच्या मुख्य प्रवाहात आणून सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडवून घेणे हीच खरी हुतात्म्यांना श्रद्धांजली, असे मत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी हुतात्म्यांना अभिवादन करत व्यक्त केले. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण …
Read More »जटगे येथे रविवारी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेची जनजागृती
खानापूर : जटगे ता खानापूर येथे रविवार दि. 22-1- 2023 रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धा होणार असून त्याकरिता जटगे परिसरातील कामतगे, शिंपेवाडी, भालके के एच भटवाडा, आदी शाळांना भेट देऊन तेथील एसडीएमसी कमिटी, नागरी अभियान कार्यकर्ता, महिला वर्ग यांना खेळाचे महत्व व मॅरेथॉन ला सहभागी होणे, याविषयी सविस्तर माहिती सांगून …
Read More »दूधगंगा नदीवर पोलिस बंदोबस्त कडक
कोगनोळी : महाराष्ट्र हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने बेळगाव दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी तालुका निपाणी येथील दूधगंगा नदीवर त्यांना प्रवेश बंदी करण्यासाठी कर्नाटक पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. बेळगाव जिल्हाधिकारी यांनी त्यांना प्रवेश बंदी केली आहे. याच पार्श्वभूमीवर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खासदार धैर्यशील माने हे बेळगाव …
Read More »खानापूरात फेब्रुवारीत कुस्ती आखाड्याचे आयोजन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरपासून जवळ असलेल्या के. पी. पाटील नगरात श्री साई प्रतिष्ठान व खानापूर तालुका कुस्ती आखाड्याच्यावतीने कर्नाटक राज्याचे शिवसेना उपाध्यक्ष के. पी. पाटील यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त येत्या १० फेब्रुवारी रोजी भव्य कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बरगाव फाट्याजवळील के. पी. नगरात आयोजित पत्रकार …
Read More »चोरीच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी फॅब्रिकेटरला अच्छे दिन
संरक्षण सेफ्टी दरवाजे करून घेण्यासाठी नागरिकांची धावपळ कोगनोळी : येथे आठ दिवसापूर्वी पडलेल्या जबरी दरोडेच्या पार्श्वभूमीवर संरक्षणाच्या दृष्टीने लोखंडी संरक्षण सेफ्टी दरवाजे करून घेण्यासाठी नागरिक फॅब्रिकेटर व्यवसायिकाकडे धाव घेत आहेत. काही नागरिकांनी ऑर्डर दिली आहेत. सुरक्षितेच्या दृष्टीने नागरिक हे पुढचे पाऊल टाकत आहे. शनिवार तारीख 7 जानेवारी रोजी येथील …
Read More »हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यासंदर्भात खानापूरात जनजागृती
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज 16 जानेवारी रोजी खानापूर शहरात पत्रके वाटून 17 जानेवारी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. तर संध्याकाळी निडगल व गर्लगुंजी येथे खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती करण्यात आली. 17 जानेवारी रोजी सकाळी ठीक 10 वाजता …
Read More »विजयपूरात राज्य पत्रकार संमेलन 4 व 5 फेब्रुवारी रोजी
विजयपूर : ऐतिहासिक विजयपूर शहरात दि. 9 व 10 डिसेंबर रोजी आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय पत्रकार संमेलन भूमीवरील चालता बोलता देव लिंगैक्य श्री सिद्धेश्वर स्वामींच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आले होते. ते संमेलन दि. 4 व 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवानंद तगडूर यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta