Saturday , November 7 2026
Breaking News

नंदगड येथे मालमत्तेच्या वादातून एकाची हत्या

Spread the love

 

खानापूर : मालमत्तेच्या वादातून भाऊबंदांनी एकाची हत्या केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी खानापूर तालुक्यातील नंदगड परिसरात घडली.

यल्लाप्पा संताराम गुरव (वय 33 वर्षे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत येणाऱ्या बाळी कोडल गावच्या वेशीवरील एका घरात सदर खुनाचा प्रकार घडला आहे.

मालमत्तेच्या वादातून यल्लाप्पाच्या भाऊबंदांनी त्याचा खून केला असल्याचे समजते. नंदगड पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून तपास कार्य हाती घेतले आहे.

About Belgaum Varta

Check Also

ओलमणीतील म्हैस चोरीचा छडा; तीन आरोपी अटकेत

Spread the love  १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या दोन म्हशी हस्तगत; शेतकऱ्याला दिलासा खानापूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *