शुभमंगल सावधान: इच्छुकांच्या लग्नकार्याला आता होणार सुरुवात निपाणी (वार्ता) : दिवाळीला धनधान्याच्या रूपाने लक्ष्मी घरी आली. अशातच परतीचा पाऊस होऊन थंडीला सुरुवात झाली. त्यानुसार कार्तिक प्रबोधनी एकादशीला शहर आणि परिसरात शनिवारी (ता. ५) सायंकाळी तुळशी विवाह सोहळा पार पडला. त्या निमित्ताने यंदाच्या लग्नाच्या हंगामातील पहिली मंगलाष्टिका नागरिकांच्या कानावर पडली. तुळशीचे …
Read More »खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल यांचा वाढदिवस साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल यांचा ५० वा वाढदिवस रविवारी दि. ६ रोजी खानापूर तालुका भाजपा कार्यालयाच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी होते. प्रारंभी माजी भाजपा शहर अध्यक्ष राजेंद्र रायका यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर भाजप नेते …
Read More »निपाणी उरुसाचा उद्या मुख्य दिवस
दर्गाह तुरबतीला मानकऱ्यांकडून गंध अर्पण : मंगळवारी ऊरूसाची सांगता निपाणी (वार्ता) : संत बाबा महाराज चव्हाण यांनी स्थापन केलेल्या पिरानेपीर दस्तगीर साहेब यांचा उरुसाला रविवापासून सुरूवात झाला आहे. रविवारी संदल बेडीचा उरुस उत्साहाने पार पडला. यावेळी भाविकांनी दर्गाह तुरबतीला नेवैद्य दाखवून नवस फेडला. भाविकांनी आपल्या दंडातील चांदीची बेडी दंडवत …
Read More »खानापूरात श्री चौराशीदेवी संगीत कलामंचच्यावतीने आयोजित संगीत भजनी स्पर्धा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : श्री चौराशीदेवी संगीत कलामंच खानापूर तालुक्याच्यावतीने संगीत भजनी स्पर्धा रविवारी पाडल्या. या स्पर्धेत ३२ स्पर्धकांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक नारायण मयेकर होते. प्रास्ताविक एम. व्ही. चोर्लेकर यानी केले. तर दीपप्रज्वलन नगरसेवक नारायण मयेकर, राष्ट्रपती पुरस्कार आदर्श शिक्षक आबासाहेब दळवी, शिवसेना राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील, …
Read More »ऊस दरासाठी उद्या आंदोलन
निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी महापूरसह विविध कारणामुळे दरवर्षी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मात्र शेतकऱ्यांना शासनातर्फे तुटपुंजी भरपाई दिली जात आहे. याशिवाय साखर कारखान्यांनी दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोड करू नये, असा साखर मंत्री व साखर आयुक्तांनी दिला आहे. तरीही त्याला केराची टोपली दाखवत अनेक साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला …
Read More »एनआयएचे पीएफआयवर पुन्हा छापे
मंगळूर, म्हैसूर, हुबळीसह विविध ठिकाणी कारवाई बंगळूर : राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी मंगळूर, म्हैसूर, हुबळीसह राज्यातील अनेक भागांत बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) नेत्यांच्या घरांवर पुन्हा छापे टाकले आहेत. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील उप्पिनगडी, सुल्या, म्हैसूर, हुबळी यासह राज्यातील अनेक ठिकाणी पीएफआय नेत्यांच्या घरांवर छापे टाकून कागदपत्रे …
Read More »समितीच्या “एकी”संदर्भात मध्यवर्ती अध्यक्षांना निवेदन!
सोमवारी महत्वपूर्ण बैठक खानापूर : खानापूर तालुक्यात म. ए. समिती दोन गटात विखुरलेली आहे. दोन्ही गट एकत्र येण्यासाठी दोन्ही गटांशी चर्चा करुन एकिची प्रक्रिया पुढे नेण्यासंदर्भात सोमवार दि. ७ रोजी सकाळी ११ वा. शिवस्मारकातील सभागृहात मध्यवर्ती म. ए. समिती प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक बोलाविण्यात आली आहे. गर्लगुंजी येथील माउली ग्रुप …
Read More »निपाणीत १२ पासून अरिहंत ट्रॉफी आंतरराज्य फुटबॉल स्पर्धा
युवा नेते उत्तम पाटील : १ लाखाचे पहिले बक्षीस निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येथील समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर शनिवार (ता.१२) ते गुरुवार (ता.१७) पर्यंत अरिहंत ट्रॉफी आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील विजेत्या संघाला १ लाखाचे बक्षीस देण्यात …
Read More »खानापूरात उद्या श्री विठ्ठल नाद संगीत भजन स्पर्धा
खानापूर (प्रतिनिधी) : श्री चौराशीदेवी संगीत कलामंचच्यावतीने खानापूर तालुका आयोजित खुला गट श्रीविठ्ठल नाद संगीत भजन स्पर्धा रविवार दि. ६ रोजी सकाळी ९ वाजता खानापूरातील केदार मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप, प्रगतशील शेतकरी पुन्नाप्पा बिर्जे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी दीपप्रज्वलन …
Read More »मानव बंधुत्व वेदिकाच्या कार्यक्रमाची सज्जता
वैचारिक विचारांचा होणार जागर : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : मानव बंधुत्व वेदिकेतर्फे निपाणीत रविवारी (ता.६) सायंकाळी चार वाजता महा पुरुषांच्या विचारांचा जागर कर्नाटक राज्य काँग्रेस प्रदेशाचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर होत आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून आठ विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta