Tuesday , November 24 2026
Breaking News

कर्नाटक

“त्या” तरुणाचा घातपात झाल्याचा संशय!

  खानापूर : गेल्या शनिवारपासून बेपत्ता झालेल्या कोडचवाड येथील तरुणाचा शोध मंगळवारी दिवसभर सुरू होता. त्या तरुणाचा खून झाल्याचा संशय बळावत असल्याने मलप्रभा नदी प्रवाहात अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक वेणुगोपाल यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी पाच वाजेपर्यंत शोध घेण्यात आला. दरम्यान, तरुणाचा मोबाईल फोन आणि शाळेची बॅग नदीत सापडली असून तरुणाची हत्या …

Read More »

रोटरीच्या ‘राष्ट्र निर्माता’ पुरस्काराने कुर्लीचे युवराज पाटील सन्मानित

  निपाणी (वार्ता) : कुर्ली येथील रहिवाशी व म्हाकवे इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हाकवे शाळेचे गणित विषयाचे शिक्षक युवराज पाटील यांना कोल्हापूर येथील रोटरी क्लब ऑफ मुव्हमेंट यांच्यातर्फे ‘राष्ट्र निर्माता’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी संतोष पाटील, …

Read More »

खानापूर समितीच्या वतीने इस्रोच्या शास्त्रज्ञाचा सन्मान!

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने चांद्रयान-३ मोहिमेत सहभागी झालेले खानापूर तालुक्यातील अनगडी गावाचे सुपुत्र कनिष्ठ शास्त्रज्ञ श्री. प्रकाश पेडणेकर यांचा त्यांच्या अनगडी येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या आई-वडीलांच्या समवेत शाल, श्रीफळ व म. ए. समितीचे स्मृतिचिन्ह देऊन समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील, …

Read More »

सोशल मीडियावर बाप्पांची एकच धूम

  ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाण्याची भुरळ; उत्सवाच्या शुभेच्छांचा पाऊस निपाणी (वार्ता) : सर्वांचाच लाडका असणाऱ्या गणपती बाप्पांचे दिमाखात आगमन झाले आहे. पाहता पाहता ७ दिवस उलटले. मागील मंगळवार (ता. १९) पासून सोशल मीडियावर गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे. घरातील गणपतीची आरास, गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे मेसेज मित्र- मैत्रिणींना शेअर केले …

Read More »

उद्या बंगळूर, शुक्रवारी कर्नाटक बंद

  एकाच आठवड्यातील दोन बंदमुळे संभ्रम बंगळूर : कावेरी पाणी वाटप वादावर एकाच आठवड्यात दोन बंद पुकारण्यात आल्याने संघटना संभ्रमात आहेत. अनेक संघटनांनी उद्या (ता. २६) होणाऱ्या ‘बंगळूर बंद’ला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे, तर शुक्रवार दि. २९ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या ‘कर्नाटक बंद’लाच पाठिंबा दिला आहे. शुक्रवारी (ता. २९) …

Read More »

कावेरी प्रश्नी पंतप्रधान मोदीनी हस्तक्षेप करावा

  देवेगौडांचे पत्र; स्वतंत्र बाह्य एजन्सी नेमण्याची विनंती बंगळूर : कावेरीतील सर्व जलाशयांचा अभ्यास करण्यासाठी या वादात पक्षकार असलेली राज्ये आणि केंद्र सरकार यांच्यापासून स्वतंत्र अशी बाह्य एजन्सी नेमण्याचे निर्देश जलशक्ती मंत्रालयाला द्यावेत, असे आवाहन माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. देवेगौडा यांनी या …

Read More »

प्रतिटन ४०० रुपयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ९ ऑक्टोबरला मोर्चा

  निपाणी (वार्ता) : आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेला चांगला दर मिळत असल्याने कर्नाटकतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४०० रुपयाप्रमाणे दुसरा हप्ता देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. त्याला रयत संघटना व हसिरू क्रांती सेनेने पाठिंबा दिला आहे. यासह विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

जयगणेश मल्टीपर्पजला ११.६१ लाखाचा नफा

  संस्थापक अभयकुमार मगदूम यांची माहिती निपाणी (वार्ता) : शेतकरी व सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी जय गणेश मल्टीपर्पज सोसायटी कार्यरत आहे. नागरिकांच्या मागणीनुसार लवकर शाखा विस्तार होणार आहे. आर्थिक वर्षात संस्थेला ११ लाख ६१ हजाराचा निवडणुका झाल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष, नगरसेवक अभयकुमार मगदूम यांनी दिली. बोरगाव येथे आयोजित संस्थेच्या १४ व्या …

Read More »

इचलकरंजी पाणी प्रकल्पामुळे कर्नाटक सीमाभागाला फटका

  नागरिकांचा विरोध कायम ; निर्णयाकडे सर्वांचे लक्ष निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातील कर्नाटक सीमाभागात असलेल्या सुळकुड गावाजवळील दूधगंगा नदीच्या बंधाऱ्यातून थेट इचलकरंजी शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचा प्रकल्प महाराष्ट्र सरकारने हाती घेतला त्याची अंमलबजावणी झाल्यास कर्नाटक सीमाभागातील पिण्याच्या पाण्यासह शेती पाण्याचा प्रश्न गंभीर बनून या भागाला मोठा फटका बसणार आहे. …

Read More »

जोयड्याचे तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांचे निधन

  खानापूर : खानापूर येथील तहसीलदार कार्यालयात गेली अनेक वर्षे उपतहसीलदार म्हणून कार्य केलेले व सध्या कारवार जिल्ह्यातील जोयडा येथील तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांचे सोमवार पहाटे अडीचच्या दरम्यान बेळगाव येथील केएलई हॉस्पिटल निधन झाले आहे. तर दोन दिवसांपूर्वीच आरोग्य बिघडल्याने चव्हाण हे हॉस्पिटलला दाखल झाले होते. राजेंद्र चव्हाण हे एक …

Read More »