Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

जांबोटी क्राॅसवरील सीडीचे काम पूर्ण होऊनही पीडब्ल्यूडीचे दुर्लक्ष, नागरिकांचे हाल

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जत-जांबोटी रस्त्यावरील जांबोटी क्राॅसवरील बालकल्याण खात्याच्या कार्यालयासमोर बांधण्यात आलेल्या सीडीेचे काम महिना होऊन गेला तरी याकडे खानापूर पीडब्ल्यूडी खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या मयेकर नगर, विद्या नगरातील नागरिकांना रस्ता बंद झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांतून नाराजी पसरली …

Read More »

बेनाडीतील मधाळे परिवाराकडून अनाथ निराधारांना जीवनावश्यक वस्तू, रोख रक्कमेची मदत

निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील मधाळे परिवाराकडून भारतीय समाज सेवा संस्था, देवांश मनुष्य समाजसेवा निराधारांचा आधार, मत्तिवडे (ता. निपाणी) या संस्थेला वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त इतर खर्चाला फाटा देऊन जीवनावश्यक वस्तू व रोख रक्कम मदत स्वरूपात देण्यात आली.  राजू मधाळे म्हणाले, आमच्या वडिलांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त, घरामध्ये वडिलांच्या फोटोचे पूजन करून नैवेद्य दाखवून, …

Read More »

करनूरमध्ये एका परप्रांतीयाचा ओढ्यातून वाहून मृत्यू

  कोगनोळी : करनूर तालुका कागल येथे कुमार विद्यामंदिर मराठी शाळे जवळील ओढा ओलांडताना मुकेश राजेश शर्मा वय वर्ष 22 राहणार मगदापूर खिरी, मोहम्मद उत्तर प्रदेश या परप्रांतीयाचा वाहून जाऊन  मृत्यू झाला. कोगनोळी टोलनाक्याच्या पुढे अपघात झाल्यानंतर लोक मारतील या भितीने सैराभैर होहुन दोन परप्रांतीय रस्ता मिळेल तिकडे धावत सुटले. …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जळगे येथे जनजागृती

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचा जागर करण्यासाठी आणि संपूर्ण तालुक्यात पुन्हा एकदा मराठी अस्मिता ज्वलंत करण्यासाठी ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आज सीमासत्याग्रहात अग्रणी असलेले जळगे गावी बैठक घेऊन पालखीचा उद्देश सांगण्यात आला. गावचे ज्येष्ठ नागरिक तसेच ज्येष्ठ सीमासात्याग्रही श्री. …

Read More »

सदलगा नगरपालिकेच्या “त्या” चार प्रभागांच्या निवडणुकीला हायकोर्टाची स्थगिती

  सदलगा : सदलगा नगरपालिकेच्या रद्द झालेल्या प्रभाग क्र. ५, १२,१५ आणि १६ च्या नगरसेवक पदाच्या निवडणुका कर्नाटक राज्य निवडणुक आयोगाने २८ ऑक्टोबरला घेण्यासंदर्भात आदेश काढला होता. त्या निवडणुकीला आज धारवाड उच्च्य न्यायालयाने स्थगिती दिली. उच्च न्यायालय धारवाडचे सरकारी प्लीडर रविंद्र उप्पार यांच्या सहीच्या पत्रानुसार १४ ऑक्टोबर २०२२ रोजी रिट …

Read More »

काम छोटे मोठे नसून त्यात मिळणारा आनंद महत्वाचा

  संजय देसाई : दोशी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन निपाणी (वार्ता) : कोणतेही काम छोटे-मोठे नसते किंवा कमी अधिक महत्त्वाचे नसते तर त्यामधून मिळणारा आनंद आणि सेवेचे समाधान मोठे असते, असे उद्गार निपाणी येथील ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक संजय देसाई यांनी काढले. मोहनलाल दोशी विद्यालय अर्जुननगर (ता. कागल) शाळेत डॉ. ए. …

Read More »

दर जाहीर करूनच कारखाने सुरू करा

  साखरमंत्री शंकर पाटील यांचा आदेश : बेंगळूरात कारखानदार-रयत संघटनांसमवेत बैठक निपाणी (वार्ता) : यंदा कोणत्याच साखर कारखान्याने दर जाहीर न करता साखर कारखाने सुरू केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे दर जाहीर केल्याशिवाय कोणत्याही साखर कारखान्याने ऊस गाळप करू नये तसेच मागील एफआरपीची थकीत रक्कम दिल्याशिवाय संबंधित साखर कारखान्याने यावर्षीचा …

Read More »

मध्यरात्री भीषण अपघात; 5 मुलांसह 9 जणांचा मृत्यू 

  हसन : अरसिकेरे तालुक्यातील गांधीनगरजवळ शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. धर्मस्थळावरून परतणाऱ्या टीटी वाहनाला बस आणि लॉरीची धडक झाली. ही घटना राष्ट्रीय महामार्ग 69 वर घडली. यात 5 मुलांसह 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 5-6 जण जखमी झाले आहेत. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात …

Read More »

भारताच्या रक्तातील एकता, प्रेम, सद्भावना पुसली जाऊ शकत नाही : राहुल गांधी

  बळ्ळारीत जाहीर सभा, पदयात्रेचा एक हजार किमीचा टप्पा पूर्ण बंगळूर : एकता, प्रेम आणि सुसंवाद ही कर्नाटक आणि भारताची परिभाषित पात्रे आहेत. उजव्या विचारसरणीच्या गटांनी त्यांना हटवण्याचा पुढील ५० वर्षांत प्रयत्न केला तरीही ते पुसले जाऊ शकत नाही, असे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी सांगितले. ते …

Read More »

खानापूर तालुक्यातील मराठी जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना ओळखा : बाळासाहेब शेलार

  खानापूर : मध्यवर्तीशी संलग्न असलेल्या खानापूर तालुका समितीच्या बैठकीत त्या गटातील समिती नेत्यांनी एका वृत्तवाहिनीला एकीसंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. त्या प्रतिक्रियांसंदर्भात 15 ऑक्टोबर रोजी “बेळगाव वार्ता”ने माझी प्रतिक्रिया प्रसारीत केली. पण त्या माझ्या प्रतिक्रियेवर काही कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांद्वारे उलटसुलट चर्चा सुरू केली आणि एकी बारगळण्यासाठी दिगंबर पाटील गट जबाबदार आहे …

Read More »