Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

ऊस दर, घर, पिकांची नुकसान भरपाई त्वरित द्या : राजू पोवार

  सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निपाणी (वार्ता) : दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सर्वच सहकारी साखर कारखाने सुरू होतात. यावेळी सर्वच शेतकर्‍यांना चांगला दर देण्याची घोषणा केली जाते. पण कारखाने सुरू झाल्यानंतर ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या तोंडाला पाणी पुसून तुटपूंजा दर दिला जातो. त्यामुळे यावर्षी एफआरपी शिवाय जादा 500 रुपये दर मिळालाच पाहिजे. …

Read More »

खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम गावातील नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिर

  खानापूर : खानापूर भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी व बेळगाव ग्रामीण भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी खानापूर तालुक्यातील तावरगट्टी गावात महालक्ष्मी मंदिर परिसरात नियती फाऊंडेशन आणि नंदादीप हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र उपचार शिबिराचे आयोजन केले होते. तालुक्याच्या सीमेवरील घनदाट वनपरिक्षेत्रातील तावरगट्टी येथील आजूबाजूच्या गावातील लोकांना …

Read More »

एससी/एसटी कोट्यात वाढ करण्यासाठी घटना दुरूस्ती करणार

  सर्व पक्षीय बैठकीतही अनुमती बंगळूर : एका मोठ्या धोरणात्मक हालचालीमध्ये, भाजप सरकारने शुक्रवारी कर्नाटकमध्ये एससी/एसटी कोटा वाढवण्याचा निर्णय घेतला, ज्यासाठी घटनादुरुस्तीची मागणी केली जाईल. न्यायमूर्ती एच. एन. नागमोहनदास आयोगाच्या अहवालावर चर्चा करण्यात आलेल्या काँग्रेस आणि धजद नेत्यांसोबत सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ही घोषणा केली. ही मागणी प्रलंबित …

Read More »

राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 3.75 टक्के वाढ

  बंगळूर : राज्य सरकारने राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांना आनंदाची बातमी दिली आहे. गेल्या एक जुलैपासून पूर्वलक्षी प्रभावाने महागाई भत्त्यात 3.75 टक्के वाढ करण्याचे आदेश जारी केले आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आणि सांगितले की, राज्य सरकारी कर्मचार्यांचा महागाई भत्ता 1 जुलैपासून 3.75 टक्के वाढविण्याचा निर्णय …

Read More »

खानापूर समितीचे सोमवारपासून जनजागृती दौरे

  उद्या नियोजनासंदर्भात बैठक खानापूर : तालुक्यात मराठी भाषिकांची एकजूट रहावी यासाठी सोमवारपासून जनजागृती करण्यात येणार असल्याचा निर्णय आज झालेल्या म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक दि. 7 ऑक्टोबर रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबर पाटील हे …

Read More »

प्रभागात विकासकामांंना चालना देऊन “नारळ फोडणार” : सुचिता परीट

  संकेश्वर (महंमद मोमीन) : प्रभागातील लोकांना आश्वासनाच्या झुल्यावर झुलवत ठेवण्याचे काम आपण कदापी करणार नाही. नगरोथान योजनेतून निधी मिळवून विकास कामांना चालना देऊनच आपण विकास कामांचा नारळ फोडणार असल्याचे प्रभाग क्रमांक १० मधील नगरसेविका सौ. सुचिता श्रीकांत परीट यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. त्या म्हणाल्या, प्रभाग १० मधील कोण-कोणती …

Read More »

संकेश्वरात श्रीनिधी-जगदीश यांचे सहर्ष स्वागत

  संकेश्वर (महंमद मोमीन) : सायकलवरून “निसर्ग वाचवा” चा संदेश घेऊन मंगळूर ते काश्मीर प्रवास दौऱ्यावर निघालेले सायकलपटू श्रीनिधी शेट्टी, जगदीश कोलार यांचे संकेश्वरात हाॅटेल मालक संघ आणि वंदे मातरम् योग केंद्रातर्फे सुधाकर शेट्टी यांनी सहर्ष स्वागत केले. यावेळी बोलताना सुधाकर शेट्टी म्हणाले, श्रीनिधी शेट्टी, जगदीश कोलार हे निसर्ग वाचवा, …

Read More »

संकेश्वरातील स्केटिंग स्पर्धेला उदंड प्रतिसाद..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात नुकतीच खुली रोलर स्केटिंग स्पर्धा पार पडली. त्याला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हुक्केरी तालुका रोलर स्केटिंग अकॅडमी, शाखा संकेश्वरच्या वतीने खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संकेश्वर अकॅडमीच्या स्केटरनी स्पर्धेत सहभागी होऊन घवघवीत यश मिळवले आहे. स्पर्धेचे उदघाटन हिरण्यकेशी साखर कारखान्याचे व्यवस्थापक …

Read More »

मृतदेह आढळल्याने करोशी गावात खळबळ

  चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील करोशी गावात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान मृतदेहाची ओळख पटली असून सुनील साळुंके (रा. करोशी ता. चिक्कोडी) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत सुनील रविवारी पहाटे आईला कामावर जाणार असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर पाच दिवसानंतर आज शुक्रवार दि. 7 ऑक्टोबर …

Read More »

दर जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांनी ऊस तोड देऊ नये

  राजू पोवार : जिल्हा पंचायत बैठकीत निर्णय निपाणी (वार्ता) : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांची शंभर किलो मिळणारी साखर रद्द करून केवळ ५० किलो साखर देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. त्या संदर्भात वार्षिक सभेत प्रश्न विचारूनही अध्यक्षांनी या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर समांतर सभा …

Read More »