Saturday , June 6 2026
Breaking News

खानापूर समितीचे सोमवारपासून जनजागृती दौरे

Spread the love

 

उद्या नियोजनासंदर्भात बैठक

खानापूर : तालुक्यात मराठी भाषिकांची एकजूट रहावी यासाठी सोमवारपासून जनजागृती करण्यात येणार असल्याचा निर्णय आज झालेल्या म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक दि. 7 ऑक्टोबर रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबर पाटील हे होते. यावेळी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक ज्येष्ठ नेते आबासाहेब दळवी यांनी केले. बैठकीच्या सुरवातीला तालुक्यातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तालुक्यातील समितीनिष्ठ कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार समितीची पुढील ध्येयधोरणे ठरविण्यासाठी खानापूर समितीची व्यापक बैठक रविवार दि. 9 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर कानडीकारणाचा वरवंटा फिरवत असून तालुक्यातील मराठी जनतेला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे राष्ट्रीय पक्ष सामान्य मतदारांना विविध आमिषे दाखवित आहेत. अश्या परिस्थितीत मराठी माणसांनी एकत्र येऊन समिती बळकट करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सोमवारपासून तालुक्यात जनजागृती दौऱ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

यावेळी बाळासाहेब शेलार, विलास बेळगावकर, अनंत पाटील, यशवंत बिर्जे, नारायण कापोलकर, मुरलीधर पाटील, डी. एम. गुरव, नारायण लाड आदींनी आपले विचार व्यक्त केले.

About Belgaum Varta

Check Also

सुपीक जमिनींसाठी शेतकऱ्यांचा लढा तीव्र; रेल्वे प्रकल्पाविरोधात आक्षेप

Spread the love  बेळगाव : बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहण प्रक्रियेला परिसरातील शेतकऱ्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *